केसरकरांना शह देण्याची मोठी खेळी, सिंधुदुर्गातील मोठ्या नेत्याने बांधले शिवबंधन

maharashtra political crisis : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये शिवसेनेने धुमाकूळ घातला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Incoming in Thackeray group started, this leader organized Shivbandhan to organize Kesarkar's program
ठाकरे गटात इनकमिंग सुरू, केसरकरांचा कार्यक्रम करण्यासाठी या नेत्याने बांधल शिवबंधन ।  
थोडं पण कामाचं
  • दीपक केसरकर यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून मोठी खेळी
  • मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काॅंग्रेस नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
  • चंद्रकांत गावडे यांनी हातात शिवबंधन बांधले.

मुंबई : शिवसेनेतील आमदार आणि खासदार यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक जण पाठिंबा देत आहे. त्यामुळे बॅकफुटावर गेलेल्या ठाकरे गटात काही नेत्यांचे इनकमिंग होण्यास सुरुवात झाली आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या नेत्याने मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले.  (Incoming in Thackeray group started, this leader organized Shivbandhan to organize Kesarkar's program)

अधिक वाचा : Z प्लस सिक्युरिटीत विशेष काय आहे? Z ते Y श्रेणी सिक्युरिटीला महत्व आहे ते जाणून घ्या

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यातून सावरण्यासाठी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी निष्ठा आणि आता शिवसंवाद यात्रा सुरू केली. त्यात बंडखोर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांच्याशी संघर्ष करण्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे व छावा दलाचे नेते विनायक भिसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अधिक वाचा : PUNE: 'बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणातून शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय', शरद पवारांच्या टीकेने नवा वाद?

सिंदुधुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटाने प्रवक्ते पद देण्यात आले. त्यांना टक्कर देण्यासाठी सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रदेश सचिव सच्चितानंद बुगडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, विभागीय सचिव संदीप कोठावळे, किरण गावडे, वैभव सुतार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. यामुळे शिवसेनेत पडलेली फूट भरुन निघणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी