Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणीत  वाढ; जात प्रमाणपत्रची छाननी समितीकडून पडताळणी होणार

Sameer Wankhede : एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्या जात प्रमाणपत्रची  पडताळणी होणार आहे.

Increase in difficulty of Sameer Wankhede caste certificate will be verified by the scrutiny committee
समीर वानखेडेंच्या अडचणीत  वाढ 
थोडं पण कामाचं
  • मुंबई एनसीबी (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरुन सध्या वादंग सुरु आहे.
  • ल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांच्या सपाट्यानंतर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरुन (Cast Certificate) अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  • दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमुळे जात प्रमाणपत्र छाननी समितीने या प्रकरणाचा तपास करण्याचं निश्चित केलेले आहे. 

Sameer Wankhede Caste Certificate Issue : मुंबई एनसीबी (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरुन सध्या वादंग सुरु आहे. अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांच्या सपाट्यानंतर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरुन (Cast Certificate) अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रांरीनुसार, मुंबई पोलीस एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. आता आणखी दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता मुंबई विभागातील जात प्रमाणपत्र छाननी समितीने देखील याप्रकरणी तपास सुरु केला आहे.  (Increase in difficulty of Sameer Wankhede caste certificate will be verified by the scrutiny committee)


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, तर दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमुळे जात प्रमाणपत्र छाननी समितीने या प्रकरणाचा तपास करण्याचं निश्चित केलेले आहे. 

 चौकशी होणार समीर वानखेडेंचीही

एका खासगी वृत्तवाहिनीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या समितीला दोन लोकांकडून तक्रार मिळाली आहे. ज्यामध्ये एका तक्रारकर्त्याचं नाव स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे, तर दुसऱ्या तक्रारदाराचं नाव भीम आर्मीचे अशोक कांबळे आहे. 

या तक्रारकर्त्यांनी तक्रार दाखल करताना आरोप लावलाय की, समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खोटे आहे. जे मिळवण्यासाठी मूळ तथ्यांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. जेणेकरुन त्यांना SC कॅटेगरीमध्ये त्यांना नोकरी मिळू शकेल. समितीनं या दोन्ही तक्रारदात्यांना 30 नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

समिती सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे म्हणणे ऐकल्यानंतर समीर वानखेडे यांना समितीसमोर हजर राहवे लागणार आहे. त्यानंतर समीर वानखेडेंचे सर्व दस्तावेजांच्या सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. 

जन्मदाखला आणि निकाहनामा यांच्या आधारावर तक्रार दाखल 

तक्रारकर्त्यांनी समितीला समीर वानखेडे यांचा जन्मदाखला आणि निकाहनामा पुरावा म्हणून दिला आहे. त्या आधारे तक्रारकर्त्यांनी दावा केलाय की, समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे आहे. 

समिती सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीमध्ये तपास करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिने असतात. तसेच गरज भासल्यास ते आणखी एखाद्या महिन्याची वेळ मागून घेऊ शकतात. जर तपासादरम्यान, हे सिद्ध झाले की, दस्तावेज खोटे आहे आणि त्याचा वापर करुन अनेक गोष्टी मिळवण्यात आल्या आहेत, तर अशा वेळी ते जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार समितीकडे असतो.  

एवढंच नाहीतर, समितीला जर काही गैरप्रकार आढळून आला, तर त्यासंदर्भातील माहिती मॅजेस्ट्रीक कोर्टाला देण्यात येईल. जर कोर्टातही दस्तावेज खोटे असल्याचं सिद्ध झाले, तर कोर्ट पोलिसांना या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश देऊ शकतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी