Mumbai Railway : पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ, 1375 ऐवजी 1383 फेऱ्या होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 01, 2022 | 16:32 IST

Increase in the number of local trains on Western Railway Line, instead of 1375 there will be 1383 trains on Western Railway Line :  मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आधी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर 1375 लोकल फेऱ्या होत होत्या. आता या फेऱ्यांची संख्या वाढून 1383 झाली आहे.

Western Railway Line
पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ, 1375 ऐवजी 1383 फेऱ्या होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ, 1375 ऐवजी 1383 फेऱ्या होणार
  • चर्चगेट ते डहाणू पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वेचा पश्चिम मार्ग
  • 39 स्टेशन, दररोज सुमारे 40 लाख प्रवासी प्रवास करतात

Increase in the number of local trains on Western Railway Line, instead of 1375 there will be 1383 trains on Western Railway Line :  मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आधी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर 1375 लोकल फेऱ्या होत होत्या. आता या फेऱ्यांची संख्या वाढून 1383 झाली आहे. आजपासून (शनिवार 1 ऑक्टोबर 2022) दररोज पश्चिम रेल्वे मार्गावर 1383 लोकल फेऱ्या होणार आहेत. वाढवलेल्या लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. 

Mumbai Crime News: कांदिवलीत गोळीबार, दोन तरूणांकडून चार राऊंड Firing, एकाचा मृत्यू; 3 जखमी

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये 31 ने वाढ झाली आहे. यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान 37 एसी लोकल फेऱ्या होतील. तसेच चर्चगेट ते बोरीवली दरम्यान 18 एसी लोकल फेऱ्या होतील.

मुंबईत आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार

प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन 15 डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर 15 डबा लोकलच्या 27 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. आधी पश्चिम रेल्वे मार्गावर 79 फेऱ्या या 15 डबा लोकलच्या होत्या. आता पश्चिम रेल्वे मार्गावर 109 फेऱ्या या 15 डबा लोकलच्या असतील. अंधेरी ते विरार दरम्यान 15 डबा लोकलसाठी आवश्यक ती तांत्रिक कामं पूर्ण करण्यात आली आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वेचा पश्चिम मार्ग

चर्चगेट ते डहाणू पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वेचा पश्चिम मार्ग आहे. यात 39 स्टेशन आहेत. या मार्गावरून दररोज सुमारे 40 लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान जलद आणि धीम्या अशा दोन्ही गतीच्या लोकल फेऱ्या धावतात. विरार ते डहाणू या भागात धीम्या सर्व स्टेशनवर थांबणाऱ्या लोकल फेऱ्या धावतात. दादर आणि प्रभादेवी पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तिथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगांव दरम्यान कोणत्याही स्टेशनवरून हार्बर मार्गावर जाऊन तिथून पुढील हार्बर मार्गावरील प्रवास करण्याची सोय उपलब्ध आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी