Article 144 Imposed in Mumbai - ओमायक्रोनचा वाढला धोका, मुंबईत दोन दिवसांची जमावबंदी लागू

राज्यात ओमायक्रोनचे १७ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आला असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. increase of omicron virus 144 imposed in mumbai

mumbai police
मुंबई पोलीस 
थोडं पण कामाचं
  • राज्यात ओमायक्रोनचा धोका
  • मुंबईत दोन दिवसांसाठी जमावबंदी लागू
  • अमरावती, मालेगावचा हिंसाचार पाहता

Article 144 Imposed in Mumbai : मुंबई : राज्यात ओमायक्रोन (omicron) धोका पाहता मुंबईत (mumbai) दोन दिवसांसाठी जमावबंदी (article 144)  लागू करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी ही जमावबंदी लागू होणार आहे. या दिवशी मुंबईत कुठल्याही प्रकारे सामाजिक (social) किंवा राजकीय (political) कार्यक्रम घेता येणार नाही.   

increase of omicron virus 144 imposed in mumbai 

राज्यात ओमायक्रोनचे १७ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आला असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

राज्यात शुक्रवारी ओमायक्रोनचे सात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ मुंबई तर ४  रुग्ण पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये आढळले आहेत. चार रुग्णांचे लसीकरण झाले असून एका रुग्णाने एकच लस घेतली आहे. एका रुग्णाने एकही लस घेतली नाही, तर एक रुग्ण साडेतीन वर्षाचा असून हा रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाही. चार रुग्णांना कुठलीही लक्षण नाहीत. तर इतर तीन रुग्णांना ओमायक्रोनची हलकी लक्षणे दिसत आहेत. 

अमरावती, मालेगावचा हिंसाचार पाहता

त्रिपुरामध्ये मशीदीत हिंसाचार झाल्यानंतर अमरावती, नाशिकच्या मालेगाव आणि नांदेडमध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एमआयएम पक्षाने औरंगाबाद ते मुंबई असा मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. त्यापूर्वीच पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी