INDIA Post GDS Recruitment 2023: Post मध्ये 40,889 पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा कराल

INDIA Postal Circle GDS Bharti 2023 : एक भरती अधिसूचना जारी करून, इंडिया पोस्टने 40 हजाराहून अधिक पदांसाठी रिक्त जागा भरल्या आहेत. ज्यासाठी उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

India Post GDS Recruitment 2023: Big Recruitment for 40,889 India Post; Learn how to apply
India Post GDS Recruitment 2023: Post मध्ये 40,889 पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा कराल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंडिया पोस्ट मध्ये हजारो पदांसाठी भरती.
  • 10वी पास अर्ज करू शकतात
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२३

INDIA Postal Circle  GDS Bharti 2023 : सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. काही दिवसांपूर्वी, इंडिया पोस्टने हजारो पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२३ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे नमूद केलेल्या स्टेप्स प्रमाणे भरतीसाठी अर्ज करू शकतात. (India Post GDS Recruitment 2023: Big Recruitment for 40,889 India Post; Learn how to apply)

अधिक वाचा : Maha TAIT Exam 2023 updates: TAIT परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा परिषदेने घेतला मोठा निर्णय

भारतीय पोस्टची ही भरती अभियान ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या 40,889 रिक्त पदांच्या भरतीसाठी केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी 2508 जागांची भरती होईल. या अभियानाद्वारे देशभरात जीडीएसची पदे भरली जाणार आहेत. GDS पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

वय मर्यादा

अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. त्याचवेळी, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार किती असेल

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 10,000 रुपये ते 24,470 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.


निवड अशी होईल

या पदांसाठी अर्जदारांची निवड इयत्ता 10वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

अधिक वाचा : Tait Exam 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख...; असे करा रजिस्ट्रेशन

अर्ज फी

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करायचा

  • सर्व उमेदवारांनी प्रथम indiapostgdsonline.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • यानंतर उमेदवार स्वतःची नोंदणी करू शकतात.
  • उमेदवाराच्या अर्जात विचारल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर अर्ज फी भरा.
  • सबमिट वर क्लिक करा.
  •  नंतर फॉर्म डाउनलोड करा.
  • शेवटी, फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी