Indian destroyer INS Mormugao to be commissioned on Sunday, INS Mormugao set to boost India naval power : ‘कोलकाता’ श्रेणीतील युद्धनौकेपेक्षा प्रभावी आणि कोणत्याही रडारमध्ये न दिसणारी असे प्रभावी स्टेल्थ तंत्र वापरणारी आयएनएस मोर्मुगाव ही विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका अर्थात डिस्ट्रॉयर उद्या म्हणजेच रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होईल. मुंबईत हा सोहळा होईल.
आयएनएस मोर्मुगावचे नेतृत्व कॅप्टन कपिल भाटिया करणार आहेत. ते विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित अधिकारी आहेत. भाटिया यांच्या नेतृत्वात 44 नौदल अधिकारी आणि नौसैनिक यांचा ताफा आयएनएस मोर्मुगाव वरती कार्यरत असेल.
उल्लेखनीय बाब म्हणजे आयएनएस मोर्मुगाववर लेफ्टनंट कमांडर श्रीहरी उबाळे आणि लेफ्टनंट कमांडर शिखर मुळे हे दोन मराठी नौदल अधिकारी पण कार्यरत असतील. लेफ्टनंट कमांडर उबाळे हे पाणबुडीविरोधी अधिकारी आहेत. तर लेफ्टनंट कमांMडर मुळे हे युद्धनौकेचे सहक्षेपणास्त्र अधिकारी (क्षेपणास्त्र विभाग उपप्रमुख) आहेत.
मुंबईत माझगाव डॉकमध्ये ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील 4 नौकांची निर्मिती करण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील घोषणा 2011 मध्ये झाली. यानंतर माझगाव डॉकमध्ये तयार झालेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आयएनएस मोर्मुगाव ही दुसरी नौका आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोर्मुगाव रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होईल.
आयएनएस मोर्मुगाव ही आयएनएस विशाखापट्टणम सारखीच ब्राह्मोस, बराक क्षेपणास्त्र (मिसाईल), दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफस्टार रडार, हायटेक इलेक्ट्रिकल वॉरफेअर सिस्टिम (युद्धप्रणाली), स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी देखरेख रडार, पाणतीर डागणारी यंत्रणा, मध्यम पल्ल्याचे आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा आदी आधुनिक यंत्रणांनी सज्ज आहे. या नौकेतील ७६ टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे. 'शौर्य, पराक्रम व विजयी भव' ही आयएनएस मोर्मुगावची युद्धघोषणा आहे. ‘डी ६७’ हा या नौकेचा क्रमांक आहे. 'प्रोत्साहित आणि मोहिम सज्ज' असे आयएनएस मोर्मुगावचे ब्रीदवाक्य आहे.
मोर्मुगाव नावाचे शहर गोव्यात समुद्रकिनारी आहे. या शहराला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. पण शहराचे मूळ नाव मोर्मुगाव आहे. मोर्मुगाव हे गोवा मुक्ती संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र होते. याच कारणामुळे नव्या विनाशिकेला मोर्मुगाव हे नाव देऊन नौदलाच्या माध्यमातूम गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला सलामी देण्यात येईल.
अनिल अंबानींच्या कंपनीचा 19 डिसेंबरला लिलाव
SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.