सर्व मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावा, मनसेच्या बाळा नांदगावकरांची मागणी 

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 20, 2022 | 15:10 IST

Install CCTV in all mosques, demand of MNS  Bala Nandgaonkar : सर्व मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावा अशी नवी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. ही मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून केली आहे.

Install CCTV in all mosques, demand of MNS  Bala Nandgaonkar
सर्व मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावा, मनसेच्या बाळा नांदगावकरांची मागणी   |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सर्व मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावा, मनसेच्या बाळा नांदगावकरांची मागणी 
  • मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावा अशी नवी मागणी मनसेकडून करण्यात आली
  • मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून केली

Install CCTV in all mosques, demand of MNS  Bala Nandgaonkar : मुंबई : सर्व मशिदींवरचे भोंगे हटविले नाही तर ३ मे २०२२ पासून परिणामांना तयार राहा, असा इशारा देणाऱ्या मनसेकडून आता आणखी एक मागणी पुढे आली आहे. सर्व मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावा अशी नवी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. ही मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून केली आहे. मनसेच्या भोंगे आणि सीसीटीव्ही संदर्भातल्या मागण्यांमुळे राज्य शासन कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील जवळपास सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही आहेत. पण मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का, असा प्रश्न मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. 'सर्वधर्मीय' प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी; असे बाळा नांदगावकर म्हणाले.

बाळा नांदगावकर यांनी मागणी ट्वीट करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग केले आहे. यामुळे मनसे लवकरच या मुद्यावरूनही आक्रमक पवित्रा घेणार, अशी चर्चा आहे. 

बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करताच राज्यातील पोलीस यंत्रणेची लगबग सुरू झाल्याचे वृत्त आहे. भोंगे आणि सीसीटीव्हीचा मुद्दा कसा हाताळावा याबाबत पोलिसांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी शासनाने या मुद्यावर शासकीय भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे पुढील काही दिवसांत भोंगे आणि सीसीटीव्ही या दोन मुद्यांवरून महाराष्ट्रात राजकारण पेटणार अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी