Internal conflict over 7 crore Trust in Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti : मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दुसरी ओळख म्हणजे अंधश्रद्धा निर्मुलन समिती. या अंधश्रद्धा निर्मुलन समितीमध्ये सात कोटी रुपयांच्या ट्रस्टवरून मोठा वाद सुरू आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा सात कोटी रुपयांचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना केला. हमीद आणि मुक्ता यांचे समर्थक संघटनेच्या कोणत्याही पदावर नाही; असेही अविनाश पाटील म्हणाले.
सध्याच्या राज्य कार्यकारिणीचा कालावधी जून २०२२ मध्ये संपणार आहे. एन. डी. पाटील यांचे निधन नुकतेच झाले आहे. या धक्क्यातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघटना सावरलेले नाही. यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत अद्याप विचार झालेला नाही. पण हमीद आणि मुक्ता यांच्या गटाने परस्पर सरोज पाटील यांना अध्यक्ष जाहीर करून ट्रस्ट ताब्यात घेतला आहे.
हमीद-मुक्ता गटाचा दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही या गटाची कार्यपद्धती आहे; असा आरोप अविनाश पाटील यांनी केला. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी अविनाश पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत. योग्य वेळी आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू; असेही हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.