Women's Day : महिलांना मुंबई महानगरपालिकेची अनोखी भेट

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 07, 2023 | 12:27 IST

International Women's Day 2023, Unique gift of Municipal Corporation of Greater Mumbai to women : मुंबई मनपाने बुधवार 8 मार्च 2023 रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अनोखी भेट महिलांना दिली आहे. 

International Women's Day 2023
महिलांना मुंबई महानगरपालिकेची अनोखी भेट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महिलांना मुंबई महानगरपालिकेची अनोखी भेट
  • महिला दिनाचे औचित्य साधून दिली भेट
  • अधिक माहिती https.//swimmingpool.mcgm.gov.in वर उपलब्ध

International Women's Day 2023, Unique gift of Municipal Corporation of Greater Mumbai to women : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मनपाचे 4 जलतरण तलाव आहेत. या तलावांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 5 ते 6 हा कालावधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच जलतरण तलाव सुविधेचा लाभ घेण्यासाठी सभासद होऊ इच्छिणाऱ्या महिलांना सभासद शुल्कात 25 टक्के सवलत देण्यात आली आहे. मनपाने बुधवार 8 मार्च 2023 रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अनोखी भेट महिलांना दिली आहे. 

जलतरण तलाव सुविधेचा लाभ घेण्यासाठी सभासद होऊ इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सभासदत्व घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाईन पेमेंट करून सभासदत्व घेता येते.  जलतरण तलावाच्या प्रकारानुसार शुल्क आकारणी केली जाते. वार्षिक शुल्क 8 हजार रुपये ते 10 हजार 100 रुपये एवढे आहे. त्रैमासिक आणि मासिक सभासदत्वाची सुविधा पण उपलब्ध आहे.

महिलांना सवलत योजनेमुळे मोठ्या जलतरण तलावासाठी वार्षिक शुल्क 10 हजार 100 रुपयांऐवजी 7 हजार 700 रुपये तर छोट्या जलतरण तलावासाठी वार्षिक शुल्क 8 हजार रुपयांऐवजी 6 हजार 080 रुपये भरावे लागणार आहे. याच पद्धतीने त्रैमासिक आणि मासिक शुल्कात देखील 25 टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे. 

आधीपासून सभासद असणा-या महिलांना देखील ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार इच्छुक महिलांनी तसा अर्ज जलतरण तलाव व्यवस्थापकांकडे दिल्यास त्यांनी पूर्वी भरलेल्या शुल्काचे व उपयोगात आणलेल्या कालावधीचे परिगणन करून (मोजदाद करून) त्यांच्या सभासदत्वाचा कालावधी वाढवून दिला जाणार आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेत नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठीची ऑनलाईन लिंक ही बुधवार 8 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. इच्छुक महिलांनी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन मुंबई मनपाने केले आहे.
झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

मजबूत हाडांसाठी खा हे 7 पदार्थ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी