Onion : कांद्याच्या दरात (onion price) मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केंद्राने कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड (NAFED) आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (National Cooperative Consumers Federation) ला निर्देश दिले आहेत. (Intervene in the market regarding onion procurement; Central Govt directives to NCCP along with NAFED)
अधिक वाचा : daily horoscope : महिलांसाठी आजचा दिवस असेल आनंदाचा
दरम्यान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, नाफेडने ताबडतोब कांदा खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. 24 फेब्रुवारी 2023 पासून खरेदी सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांकडून 900 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने सुमारे 4000 मेट्रीक टन कांद्याची थेट खरेदी केली आहे.
अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय महिला दिनी माई, ताईला द्या शुभेच्छा
नाफेडने 40 खरेदी केंद्रे उघडली आहेत, शेतकरी तेथे त्यांचा कांदा विकू शकतात. कांदा विक्रीचे पैसे ऑनलाइन त्यांना मिळू शकतात. नाफेडने खरेदी केंद्रांवरुन दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद आणि कोची या ठिकाणी साठा नेण्याची व्यवस्था केली आहे.
मागणी आणि पुरवठा तसेच निर्यात क्षमतेमुळे किंमती स्थिर राहिल्या. फेब्रुवारी महिन्यात लाल कांद्याच्या किंमतीत घसरण झाली. महाराष्ट्र राज्यात कांद्याला 500 ते 700/क्विटल पर्यंतचा दर मिळाला. दरातील ही घसरण इतर राज्यांतील एकूणच वाढलेल्या उत्पादनामुळे तसेच देशातील प्रमुख उत्पादक जिल्ह्यांतील म्हणजेच नाशिकमधील पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : जाणून घ्या महिलादिनचं राशीभविष्य; कसा असेल आजचा दिवस
दरम्यान, वर्ष 2022-23 मध्ये कांद्याचे अंदाजे उत्पादन 318 लाख मेट्रिक टन होणार आहे. जे मागील वर्षीच्या 316.98 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे.
सर्व राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.