High Court on Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास ATS कडे; आता तरी हल्लेखोर सापडतील, कुटुंबियांना आशा

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 03, 2022 | 15:58 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणाचा (murder case) तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court)परवानगीनं एसआयटीकडून तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (Investigative Anti-Terrorism Squad) सुपूर्द करण्यात आला आहे. साल 2015 पासून तपास करत असलेल्या एसआयटीला अपेक्षित यश येत नसल्यानं कुटुंबियांनी विनंती केली होती.

Comrade Govind Pansare murder case investigation to ATS
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास ATS कडे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एसआयटीला अपेक्षित यश येत नसल्यानं कुटुंबियांनी ATSने तपास करावी अशी विनंती केली होती.
  • न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दिला आदेश
  • कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या तपासात एसआयटी अधिकारी एटीएसची मदत करणार

Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणाचा (murder case) तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court)परवानगीनं एसआयटीकडून तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (Investigative Anti-Terrorism Squad) सुपूर्द करण्यात आला आहे. साल 2015 पासून तपास करत असलेल्या एसआयटीला अपेक्षित यश येत नसल्यानं कुटुंबियांनी विनंती केली होती. पानसरे कुटुंबियांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला असून आता एसआयटीतील (SIT) काही अधिकारी एटीएसला (ATS) तपासात सहकार्य करणार आहेत. 

न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने म्हटले की, पानसरे यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आलाय. सात वर्षांपासून या प्रकरणाच्या तपासात एसआयटीला अपेक्षित यश येत नसल्याने पानसरे कुटुंबीयांनी प्रकरण एटीएसकडे सोपवण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

आता तरी हल्लेखोर सापडतील

सात वर्षांनंतर देखील तपासात यश येत नव्हतं, अनेक दिवसांपासून याबाबत आम्ही मागणी करत होतो. आता हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे, त्यामुळे अपेक्षा आहेत की हल्लेखोर सापडतील, अशी प्रतिक्रिया मेघा पानसरे (Megha pansare ) यांनी दिली. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे खूप गरजेचं आहे. एटीएसकडे हा तपास दिल्याने याचा तपास गतिमान होईल अशी आशा आहे, असेही मेघा पानसरे म्हणाल्या. 

सात वर्षापासून पोलीस हल्लेखोराच्या शोधात  

16 फेब्रुवारी 2015 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोल्हापूरातील या प्रकरणाच्या तपास करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. मात्र इतकी वर्ष तपास करूनही एसआयटीच्या हाती काहीच लागलेलं नाही, त्यामुळे एसआयटीच्या तपासाबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून आता तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी