IPS Deven Bharti appointed as Mumbai first special commissioner of police : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी देण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदाच एक नवे पद तयार करण्यात आले आहे. देवेन भारती यांना मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. आधी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त अशी पदे होती. पण देवेन भारती यांच्या नियुक्तीसाठी नव्या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट देण्यात आली. यानंतर देवेन भारती यांना मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले. या दोन मोठ्या निर्णयांमुळे राज्याच्या राजकारणातले फडणवीसांचे महत्त्व अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर देवेन भारती यांची वाहतूक विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती झाली. आता शिंदे-फडणवीस सरकारला सहा महिने झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे एकदम मोठी जबाबदारी आली आहे. याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते.
पुढील काही महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधीच देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त झाले आहेत.
Paush Purnima : कधी आहे नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा? जाणून घ्या पौर्णिमेचे व्रत आणि उपाय
January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.