Mhada Lottery in Mumbai । मुंबईत २२ लाखांत म्हाडाच्या 1 BHK घर, ४ हजार घरांसाठी लवकरच सोडत, जाणून घ्या कुठली आहे घरं

Mhada Mumbai Lottery 2022 : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी एक आंनदाची बातमी आहे. म्हाडा नव्या वर्षात म्हणजेच जुलैमध्ये म्हाडा मुंबईत 4 हजार घरांची सोडत काढणार आहे.

It was possible to buy a house in Mumbai on a budget, leaving for 1 BHK of MHADA houses
मुंबईत बजेटमध्ये घर घेणं झालं शक्य, म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी लवकरच सोडत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत घर घेण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी एक आंनदाची बातमी आहे.
  • म्हाडा मुंबईत 4 हजार घरांची सोडत काढणार आहे.
  • सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी

Mhada Mumbai Lottery july 2022 । मुंबई : मुंबईत आपलं स्वतःच हक्काच घर असाव, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण गगनचुंबी टाॅवरमधल्या फ्लॅटचे दर एेकले की छातीत धडकीच भरते. पण मुंबईकरांची घरांची आस आता संपली असून त्यांना आपले स्वतःच्या घराचे स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हे आहेत. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे नव्या वर्षात म्हणजेच जुलैमध्ये म्हाडा मुंबईत (Mumbai MHADA)  4 हजार घरांची सोडत काढणार असल्याचं वृत्त आहे. (It was possible to buy a house in Mumbai on a budget, leaving for 1 BHK of MHADA houses)

Also Read : 10-12वीचा लवकरच येऊ शकतो निकाल

मुंबईत बिल्डर्सची न परवडणारी घरं मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली असताना म्हाडाकडूनतीन एक वर्षापासून मुंबईत म्हाडाने घराची सोडतच काढलेली नाही. पण आता घराचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्षा संपणार आहे. म्हाडा घरांसाठी लवकरच सोडत निघणार आहे. प्राप्त माहितीनुसार यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात जवळपास 4 हजार घरांसाठी म्हाडा लॉटरी (MHADA Lottery) निघणार आहे.

Also Read : पेरूच्या शेतीतून मिळवला तब्बल २५ लाखापेक्षा जास्त नफा

पण म्हाडाची ही घरं गोरेगावच्या डोंगरी परिसरात आहेत. 4 हजार घरांपैकी सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील. तीही वन बीएचके. 23 मजल्यांच्या सात इमारतींमध्ये 1239 घरं उपलब्ध असतील. उन्नतनगर क्रमांक 2 इथेही अत्यल्प उत्पन्न गटासाठी 708 घरं असतील तर अल्प उत्पन्न गटासाठी 736 घरे असतील. मध्य उत्पन्न गटासाठी 227 घरी उपलब्ध असणार आहेत. तर उच्च उत्पन्न गटामध्ये 105 घरांचा समावेश असेल. गोरेगावनंतर म्हाडाकडून अँटॉप हिल, कन्नमवारनगर तसच दक्षिण मुंबईतल्या घरांचाही सोडतीत समावेश केला जाणार आहे. जवळपास 1 हजार घरं या भागात उपलब्ध होणार आहेत.

Also Read : IND vs SA: तिसऱ्या कसोटीत या खेळाडूला संधी देणार Virat Kohli


म्हाडाने मुंबईकरांसाठी यापूर्वी अनेक सोडती काढल्या. मात्र या वेळी म्हाडाची सोडत ही मुंबईकरांसाठी काहीसी खास असणार आहे. कारण, कोरोना व्हायरस महामारीचे सावट आणि त्यात अडकलेली एकूण यंत्रणा. या पार्श्वभूमीवर पाठीमागील तीन वर्षांपासून म्हाडाने घरांची सोडतच काढली नव्हती. त्यामुळे म्हाडाची या वेळची सोडत काहीशी विशेष ठरु शकते. याशिवाय या वेळच्या सोडतीत विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे असणार आहेत. त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांना घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी