नेरूळचे ITM-IHM कॉलेज साजरा करणार MELANGE कार्यक्रम 

मुंबई :  नेरूळच्या TM-IHM कॉलेज साजरा करणार MELANGE कार्यक्रम  करण्यात येणार आहे. ITM-ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या देशभरातील कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची  वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार केले जाते.

ITM IHM Nerul, event Melange 2023
नेरूळच्या TM-IHM कॉलेज साजरा करणार MELANGE कार्यक्रम   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : नेरूळचे ITM-IHM कॉलेज साजरा करणार MELANGE कार्यक्रम  करण्यात येणार आहे. ITM-ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या देशभरातील कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची  वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार केले जाते. त्याचा एक भाग म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले जाते.  (ITM IHM Nerul, event Melange 2023)

दरवर्षी कॉलेजच्या माध्यमातून  सांस्कृतिक उपक्रमांसह हॉस्पिटॅलिटी आणि पाककला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन ITM IHM, नेरुळ प्लॉट नं. D-222/28, बाफना मोटर्स जवळ, MIDC नेरुळ 2nd & 3rd Floor, S Central Rd, Shiravane, Nerul, Navi Mumbai येथे आयोजित करण्यात आले. 

कॉलेजमधील विद्यार्थी यावेळी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून आपल्या पाककलेचा नमुना सादर करणार आहे. तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहे.  जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आव्हान पेलण्यासाठी तसेच नवोदित उद्योजकांना ज्ञान प्रदान करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे कॉलेजकडून सांगण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी यावेळी उपलब्ध करून देण्यात येते. 

यावेळी या कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी स्टॉल लावतील, त्यांच्या समकक्ष, कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसाठी मनोरंजनासह पाक उत्पादनांची विक्री करतील यात सुमारे 6 हजार जणांचा सहभाग अपेक्षित आहे. 
 

खास आकर्षण 

यावेळी शेर-ए-पंजाब नावाचा एक फूड स्टॉल आहे ज्यात विविध प्रकारचे पंजाबी खाद्यपदार्थ आहेत. या स्टॉलचे इंस्टाग्रामवर sher_e._punjab नावाचे पेज आहे. २४ आणि २५ फेब्रुवारी - संध्याकाळी ६ हे स्टॉल ओपन राहणार आहेत. गेट पासची किंमत:- रु. १०० आहे. 

यावेळी या स्टॉलवर विविध प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी पंजाबी आणि सिंधी फूट खवय्यांना चाखायला मिळणार आहे. यात लस्सी, मसाला चाय , चिकन मलाई टिक्का, अमृतसरी फिश, चिकन चीज टिक्की, मिनी समोसा, पनीर टिक्का, स्टफ्ड कुलचा, दाल पकवान, बटर चिकन कॉम्बो, राजमा चावल कॉम्बो, गुलाब जामुन, मलाई पॉप्सिकल. याचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी