Mumbai News : मुंबई : मुंबईच्या गर्दीत कुणाचा पाठलाग करणे शक्यच होणार नाही असे मत व्यक्त करत कोर्टाने महिलेचा पाठलाग करणाच्या आरोपाखाली एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच आरोपीने गैरसमजातून महिलेने आपल्यावर आरोप केल्याचे म्हटले आहे. कोर्टानेही आरोपीची हे म्हणने मान्य केले आहे. (its impossible to stalk in mumbai rush hour court cleared charges of man on stalking )
अधिक वाचा : Hunger Strike : आमदार कैलास पाटील यांचा उपोषणाचा तिसरा दिवस, मागण्या अजून प्रतिक्षेत
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे चिरा बाजारमध्ये स्वतःचे गाड्या दुरुस्त करण्याचे गॅरेज आहे. तर तक्रारदार महिला चिरा बाजारची रहिवासी आहे. सदर महिला दररोज चालत मरीन लाईन्स स्थानकात जाते. तेव्हा या व्यक्तीने आपला बाईकवर पाठलाग केला असा आरोप महिलेने केला. तसेच या व्यक्तीने आपल्याकडे वाईट नजरेने पाहिले की आपल्याला अवघडल्यासारखे झाल्याचेही महिलेने सांगितले. काही दिवसानंतर या व्यक्तीने आपल्याला आवाज देत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचा महिलेने सांगितले. त्यानंतर महिलेने आपल्या दोन मित्रांच्या सल्ल्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली.
अधिक वाचा :Vegetables Price Hike :ऐन दिवाळीत सामान्यांना महागाईचा झटका, भाज्यांचे दर भिडले गगनाला
मुंबईच्या एवढ्या गर्दीत बाईकवरून कुणाचा पाठलाग करणे अशक्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. सकाळी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी असते. अशावेळी फूटपाथवर चालण्यासाठीही जागा नसते. अशा वेळी एखाद्याने बाईकवर कुणाचा पाठलाग करणे अशक्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच आरोपीने हे सर्व गैरसमजातून झाल्याचे स्पष्टीकरण दिले. कोर्टानेही आरोपीचे हे स्पष्टीकरण मान्य करत महिलेने गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे म्हटले.
अधिक वाचा : Diwali : मुंबईत गेल्या 8 वर्षांत दिवाळीत सर्वाधिक प्रदूषण, हवेच्या गुणवत्तेने गाठला निचांकी स्तर
कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलीच तर महिलेला यावर प्रश्नही विचारले. आरोपी आपला तीन महिने पाठलाग करत होता असे महिलेने आपल्या तक्रारी म्हटले आहे. जर आरोपी तीन महिने तुमचा पाठलाग करत होता तर तक्रार दाखल करायला तुम्हाला एवढा उशीर का लागला? असा सवाल कोर्टाने महिलेला विचरला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.