राज्यासह देशभरात जन्माष्टमीचा उत्साह, मुंबईतल्या ७०% दहीहंड्या रद्द

मुंबई
Pooja Vichare
Updated Aug 24, 2019 | 10:07 IST

राज्यासह देशभरात जन्माष्टमीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. पण मोठमोठ्या आयोजकांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून बऱ्याच दहीहंड्या रद्द केल्यात आहेत. त्यामुळे गोविंदामध्ये नाराजी दिसून येत आहे.

DahiHandi
राज्यासह देशभरात जन्माष्टमीचा उत्साह, ७०% दहीहंड्या रद्द  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यासह देशभरात जन्माष्टमीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय.
  • मोठमोठ्या आयोजकांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून बऱ्याच दहीहंड्या रद्द केल्यात आहेत.
  • पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलील्या महापुरामुळे मुंबईतल्या जवळपास ७० टक्के दहीहंड्या आयोजनकांनी रद्द केल्यात.

राज्यासह देशभरात जन्माष्टमीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. पण मोठमोठ्या आयोजकांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून बऱ्याच दहीहंड्या रद्द केल्यात आहेत. त्यामुळे गोविंदामध्ये नाराजी दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलील्या महापुरामुळे मुंबईतल्या जवळपास ७० टक्के दहीहंड्या आयोजनकांनी रद्द केल्यात. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे यंदा मोठ्या प्रमाणात गोविंदांचं आयोजन केलं जाईल अशी आशा होती. पण त्यावर महापुरानं पाणी फेरलं. 

मुंबईतल्या गिरगाव, लालबाग, परळ, काळाचौकी, दादर, माहीम, वरळीसह घाटकोपर, बोरिवली यासह अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं जातं. पण यंदा जवळपास सर्वच मोठ्या हंड्या रद्द केल्यात. यावर्षी वरळीच्या जांबोरी मैदानातली आमदार सुनिल शिंदे सचिन अहिर यांच्या हंड्या रद्द केल्यात. तर बोरिवलीतील प्रकाश सुर्वे यांचीही हंडी रद्द केली आहे. तसंच माजी आमदार कालिदास कोळंबकर, अरूण दुधवडकर यांची एसी मार्केटमध्ये होणारा उत्सव, गिरगावमधील  पांडुरंग सकपाळ यांचाही गोविंदा रद्द केला आहे. 

गोविंद पथकांची पूरग्रस्तांना मदत 

अनेक गोविंदा पथकांनी बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रक्कमेतून काही रक्कम पूरग्रस्तांना देण्याचं अनेक गोविंदा पथकांनी ठरवलं आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुंबईच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत दहीहंडी मंडळांचे हजारो गोविंदा सराव करताना पाहायला मिळाले. यंदा मुंबापुरीत सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी होईल. 

गोविंदांवर करडी नजर 

दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांपैकी मद्यपी आणि वाहतुकीचे अन्य नियम मोडणाऱ्या गोविंदांची गय केली जाणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी स्थानिक पोलिसांसह विशेष पथकं मिळून ४० हजारांवर पोलीस रस्त्यावर असतील अशी माहिती पोलीस प्रवक्ता प्रणय अशोक यांनी सांगितलं. 

यासोबतच महिलांविरोधी गुन्हे, किरकोळ कारणांवरून हाणामारी असे प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय योजले आहेत. पोलीस ठाण्याचा बंदोबस्त, सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड असा बंदोबस्त तैनात असेल. 

शाळा, कॉलेजना सुट्टी

दहीहंडीनिमित्त आज नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शाळांसह उच्च माध्यमिक विद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्सव काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला गेला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी