मुंबईच्या झोपडपट्टीत मुख्यालय असलेल्या पक्षाला मिळाली ९० कोटींची देणगी, Income Tax विभागाने सुरू केली चौकशी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Sep 09, 2022 | 16:33 IST

Jantawadi Congress Party In Mumbai Got Rs 90 Crore Donation Transactions On Income Tax Radar : मुंबईच्या चुनाभट्टी येथे असलेल्या झोपडपट्टीत जनतावादी काँग्रेस पार्टी नावाच्या राजकीय पक्षाचे मुख्यालय आहे. या राजकीय पक्षाला आतापर्यंत ९० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

Jantawadi Congress Party
झोपडपट्टीत मुख्यालय असलेल्या पक्षाला ९० कोटींची देणगी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • झोपडपट्टीत मुख्यालय असलेल्या पक्षाला ९० कोटींची देणगी
  • Income Tax विभागाने सुरू केली चौकशी
  • मुंबईतला आहे राजकीय पक्ष

Jantawadi Congress Party In Mumbai Got Rs 90 Crore Donation Transactions On Income Tax Radar : राजकीय पक्षांना कोणी किती देणगी द्यावी यावर काही बंधन नाही. पण आर्थिक अफरातफर करण्यासाठी किंवा विशिष्ट बेकायदेशीर हेतू साध्य करण्यासाठी देणगीच्या रुपात मोठी रक्कम दिली जात असल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार सरकारच्या तपास यंत्रणांकडे आहे. मुंबईत तर एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे सरकारी यंत्रणा एकदम सावध झाली आहे. 

मुंबईच्या चुनाभट्टी येथे असलेल्या झोपडपट्टीत जनतावादी काँग्रेस पार्टी नावाच्या राजकीय पक्षाचे मुख्यालय आहे. हा नोंदणीकृत पक्ष महाराष्ट्र तर सोडा मुंबईच्या राजकारणातही कोणाच्या खिजगणतीत नाही. पण २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाला आतापर्यंत ९० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. याच कारणामुळे राजकीय पक्षाला देणगी देण्याच्या नावाखाली हवाला रॅकेटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आयकर विभागाचेही या व्यवहारांकडे लक्ष वेधले गेले आहे. नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. 

चित्रविचित्र पुतळे

मुंबईसह ६ शहरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका

चाळीतील दुमजली खोलीतले पक्ष मुख्यालय, बाहेर लावलेला पक्षाचा फलक एवढेच ठळक अस्तित्व असलेल्या जनतावादी काँग्रेस पार्टी नावाच्या राजकीय पक्षाला ९० कोटी रुपयांची देणगी दिली कोणी हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण देणगीच्या रुपात मिळालेल्या पैशांचा वापर पक्ष कार्यात झाला आहे. पैशांचा गैरवापर झालेला नाही. पक्षाच्या खर्चाची माहिती नियमांच्या चौकटीत राहून निवडणूक आयोगाला सादर केली आहे; असा दावा पक्षाध्यक्ष संतोष काटके यांनी केला आहे. आयकर विभागाचा मात्र पक्षाध्यक्षांच्या वक्तव्यावर विश्वास नाही. याच कारणामुळे त्यांनी चौकशी सुरू ठेवली आहे. 

जनतावादी काँग्रेस पार्टी नावाच्या राजकीय पक्षाने २०१५ मध्ये स्थापना झाल्यानंतर थेट २०१८ मध्येच निवडणूक लढविली. या पक्षाने राजस्थान आणि मध्यप्रदेशात काही जागांवर विधानसभा निवडणूक लढवली होती. या जागांवर त्यांचा पराभव झाला होता. पण हा पक्ष आजही कार्यरत आहे. त्यांच्या आर्थिक व्यहारांविषयी संशय बळावत आहे. 

आयकर विभागाने बुधवार सात सप्टेंबर २०२२ रोजी देशातील १२३ नोंदणीकृत पण कोणालाही माहिती नसलेल्या राजकीय पक्षांशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले. काही हवाला ऑपरेटर्सच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले. यावेळी आयकर खात्याला आर्थिक अनियमितता, करचुकवेगिरी, बोगस देणग्या आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सुगावा लागला. यापैकी दोन संशयास्पद असलेले राजकीय पक्ष मुंबईतील आहेत. यापैकी जनतावादी काँग्रेस पार्टी हा पक्ष चुनाभट्टीत आहे. तर आणखी एक पक्षाचे मुख्यालय हे बोरिवली येथील एका फ्लॅटमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या दोन्ही पक्षांना मिळून तब्बल १५० कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

अनेकदा हवाला ऑपरेटर किरकोळ पक्षांना कोट्यवधींची देणगी देतात. नंतर ही रक्कम वेगवेगळ्या खर्चांच्या रुपाने इतरत्र वळवण्यास सुरुवात होते. हवाला ऑपरेटर बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम अखेरीस ज्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करायची त्याच्याकडे पाठवतात. या पूर्ण व्यवहारात पैसे फिरवण्यासाठी ज्या पक्षांचा आधीवापर होतो त्यांना एकूण रकमेच्या ०.०१ टक्का इतके कमिशन मिळते. कलम २९ ए अंतर्गत नोंदणी झालेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला एखादी व्यक्ती कितीही देणगी देऊ शकते. त्यानंतर संबंधित व्यक्ती देणगीच्या रक्कमेवर कलमाखाली ८०जीजीसी अंतर्गत सूट मिळवू शकते. या नियमांचा गैरफायदा घेण्यासाठी कागदोपत्री काही पक्ष आणि कंपन्यांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून मोठी उलाढाल केली जाते. आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी