मलिक- वानखेडे वाद : मी तुमचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का?; जास्मिन वानखेडेंचा नवाब मलिकांना इशारा

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 21, 2021 | 14:58 IST

मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) आणि जास्मिन वानखेडे (Jasmine Wankhede) यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहे.

Jasmine Wankhede's warning to Nawab Malik
मी तुमचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का?; जास्मिन वानखेडेंचा नवाब मलिकांना इशारा   |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई:  मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) आणि जास्मिन वानखेडे (Jasmine Wankhede) यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आज माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि जास्मिन वानखेडे यांच्यावर नव्याने काही आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. मलिकांच्या आरोपाला जास्मिन वानखेडे उत्तर दिले आहे. 

कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित असल्याचे पुरावे देखील सादर केले आहेत. यावरून जास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.

मी नवाब मलिक यांचे ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का, असा इशारा जास्मिन वानखेडे यांनी दिला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियावर आता जास्त बोलणार नाही वेळ आली की नक्की बोलेन, असं त्या म्हणाल्या. तसेच ऑस्ट्रेलियाबद्दल नवाब मलिक यांना विचारा ते सांगतील, असेही यास्मिन यांनी म्हटले आहे.  जास्मीन आणि समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना मलिक म्हणाले की, चित्रपटसुष्टीतील लोक मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे यांच्या घरातील व्यक्ती तेथे होता. त्यांनी मालदीवमध्ये वसुली केली.

तसेच सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस अप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले, असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी