Jaya Bachchan राजभवनातून बाहेर येताच..., कोणावर भडकल्या?

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लिल टिपण्णी केली. याच पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीच्या महिला खासदार-आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

Jaya Bachchan angered by leaders who speak obscenely about women
Jaya Bachchan का भडकल्या, राज्यपालांना निवेदन देऊन बाहेर येताच...  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिलांवर होणाऱ्या अश्लिल टिपण्णीवर महाविकास आघाडीच्या महिला आमदार व खासदार आक्रमक
  • शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
  • राज्यपालांसमोर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचला.

मुंबई :  कळव्यातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली. त्यामळे व्यथित झालेल्या आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेले भाष्य, गुलाबराव पाटीलनी सुषमा अंधारेंवर केलेले वक्तव्य, संभाजी भिडेंनी महिला पत्रकाराला टिकली लावण्याचा दिलेला सल्ला इ. विषयांवर महाविकास आघाडीच्या महिला आमदार-खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. (Jaya Bachchan angered by leaders who speak obscenely about women)

महाविकास आघाडीच्या महिला खासदार-आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, राष्ट्रवादी नेत्या फौजिया खान, विद्या चव्हाण, आदिती तटकरे, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, ऋतुजा लटके, वंदना चव्हाण आणि मनिषा कायंदे यांचा समावेश आहे.

राज्यभवनाच्या बाहेर आलेल्या शिष्टमंडळासह जया बच्चन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  यावेळी जया बच्चन म्हणाल्या की, 'राज्यपालांनी असे म्हटले की राज्यपालांच्या काही मर्यादा असतात, ही बाब फार दु:खद आहे. कारण हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना याविषयी पत्र लिहिले असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे की त्यांना राज्यपालांचे पत्र मिळाले आहे. त्यांनी याविषयी निवेदन दिले पाहिजे. ज्यांची चुकीचं काम केलं आहे, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. यामुळे केवळ महिलांचेच नव्हे तर राजकारणाचेही नाव बदनाम होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी