झाडी, डोंगारवाल्या शहाजी बापूंनी धरले चंद्रकांतदादांचे पाय, बंडखोर आमदारांचे भाजपकडून जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र सोडल्यापासून तब्बल 12 दिवसांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईत पाऊल ठेवले. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासमवेत विमानात आणि बसमधून आल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विमानतळ आणि हाॅटेलमध्वये त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते हजर होते.

Jhadi, Dongar Fame Shahaji Patil grabs Chandrakant Patil's legs, BJP welcomes rebellious MLAs in Jallosha
झाडी, डोंगारवाल्या शहाजी बापूंनी धरले चंद्रकांतदादांचे पाय, बंडखोर आमदारांचे भाजपकडून जल्लोषात स्वागत ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे मुंबईत स्वागत
  • भाजप नेत्यांनी सर्व आमदारांचे हसत-खेळत स्वागत केले.
  • काय झाडी, काय डोंगार' या डायलॉगसाठी फेममध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांना पाहून भाजप नेते चांगलेच खुश

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर, १२ दिवसांपासून महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते हाॅटेल ताज प्रेसिडेंटच्या गेटवर उभे राहून येणाऱ्या प्रत्येक आमदारांचे स्वागत करत होते. दरम्यान, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील येताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खूप खूश झाले. त्याचवेळी मात्र, शहाजीबापूंनी चंद्रकांत दादांच्या पाया पडले. (Jhadi, Dongar Fame Shahaji Patil grabs Chandrakant Patil's legs, BJP welcomes rebellious MLAs in Jallosha)

अधिक वाचा : शिंदे गटातील बंडखोर आमदारांची घरवापसी, मुंबईत पोहचताच जय श्रीरामच्या घोषणा

महाराष्ट्रात रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. शिंदे गट व भाजपच्यावतीने राहुल नार्वेकर यांनी तर शिवसेनेचे राजन साळवी यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने व्हीप जारी केला आहे. शिवसेनेचे व्हिप प्रमुख सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपल्या आमदारांना उद्या विधानसभेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

अधिक वाचा : हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने साजरा केला घोडीचा वाढदिवस, तब्बल ७०० पाहुण्यांच्या करण्यात आली होती जेवणाची सोय, त्याचाबरोबर......

महाराष्ट्रातील 50  बंडखोर शिवसेना आमदार शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गोव्याहून मुंबईत परतले. सर्व बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंसीमध्ये पोहोचले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची येथे संयुक्त बैठक होत असून, त्यात पुढील रणनीती तयार केली जाणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर दोन दिवसांनी ५० बंडखोर आमदार मुंबई पोहचले. यावेळी त्यांचे स्वागत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रसाद लाड आदीं स्वागत केल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी, काय झाडी, काय डोंगारफेम आमदार शहाजी पाटील यांना पाहून चंद्रकांत पाटील यांनीही आनंद झाल्याचं दिसून आले. 

अधिक वाचा : Eknath Shinde Government : धक्कातंत्राच्या घातक ट्रेंडपासून सावधान, निर्णयाची योग्यता ठरवायची कशी?

गिरीश महाजन यांनी शहाजी पाटील यांना पाहताच चंद्रकांतदादांना काय झाडी, काय डोंगार, काय हाॅटेल, एकमन ओकेच्या व्हायरल कॉलची आठवण करुन दिली. त्यावेळी, चंद्रकांत पाटलांसह इतरही भाजप नेत्यांनी मनमोकळे पणे हसले . यावेळी शहाजी पाटील यांनी चक्क चंद्रकांत पाटील यांचे पाय धरले, त्यावेळी पाटील यांनीही शहाजी पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी