राज ठाकरे यांना मास्क न लावल्याबद्दल पत्रकाराने विचारला प्रश्न, राज ठाकरेंनी म्हटलं...

मुंबई
Updated Feb 27, 2021 | 13:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

मराठी भाषा दिनानिमित्त आज शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आज उपस्थिती लावली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना मास्क न लावण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी अजब उत्तर दिले.

Raj Thackeray
पत्रकाराने राज ठाकरे यांना मास्क न लावल्याबद्दल विचारला प्रश्न, राज ठाकरे यांनी दिलं अजब उत्तर 

थोडं पण कामाचं

  • मी मास्क वापरतच नाही - राज ठाकरे
  • सरकारच्या निर्देशांवर राज ठाकरे यांची टीका
  • विविध विषयांवर ठाकरे यांची टिप्पणी

मुंबई: मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi language day) आज शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज उपस्थिती लावली. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असूनही ठाकरे यांनी यावेळी मास्क (mask) लावलेला नव्हता. एकीकडे कोरोनाचा प्रसार (corona spread) रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नागरिकांना सातत्याने मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत जिथे त्यांचे चुलत भाऊ असलेले राज ठाकरे मात्र मास्क न घालता वावरत आहेत. यावरून एका पत्रकाराने (journalist) त्यांना प्रश्न (question) विचारला ज्याचे त्यांनी अजब (odd answer) उत्तर दिले.

मी मास्क वापरतच नाही - राज ठाकरे

एका पत्रकाराने या कार्यक्रमात राज ठाकरे यांना मास्क न वापरण्याचे कारण विचारले. त्यावेळी ठाकरे यांनी मी मास्क लावतच नाही, तुम्हाला सांगतोय असे उत्तर दिले. या उत्तराद्वारे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मास्क लावण्याच्या आवाहनाला अजिबातच प्रतिसाद न दिल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील लोकांना बाहेर पडताना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या कार्यक्रमात समोर खूप गर्दी असूनही राज ठाकरे यांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे.

सरकारच्या निर्देशांवर राज ठाकरे यांची टीका

या कार्यक्रमादरम्यान ठाकरे यांनी वेगवेगळ्या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी सरकारने कोरोनाच्या प्रसारावर रोख लावण्यासाठी जारी केलेल्या नियमांवरही टीका केली. शिवजयंती किंवा मराठी भाषादिनाच्या कार्यक्रमाला गर्दी न करण्याच्या निर्देशांवर हल्ला चढवताना त्यांनी म्हटले की राजकीय कार्यक्रमांना गर्दी केलेली चालते, मात्र या कार्यक्रमांना गर्दी न करण्याचे आवाहन केले जाते. परिस्थिती इतकीच गंभीर असेल तर निवडणुका पुढे ढकलाव्यात असेही त्यांनी यावेळी म्हटले.

विविध विषयांवर ठाकरे यांची टिप्पणी

यावेळी ठाकरे यांना विचारण्यात आले की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन फक्त निवडणुकांच्या वेळीच का दिले जाते आणि यावर राजकारण का केले जाते. यावर बोलताना त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचीच फिरकी घेत नेमके काय राजकारण केले जाते असे विचारले. तसेच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका कलाकारांना बसल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी