Devendra Fadanvis : आमदार बांगर आणि सुर्वेंवरून पत्रकारांनी धरले धारेवर, फडणवीस म्हणाले ही तर आमचीच मुस्कटदाबी 

Devendra Fadanvis : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे यांच्या दादागिरीवरून आज सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले.

Journalists asked Fadnavis Shinde a question about MLA Bangar and Surve
फडणवीस म्हणाले ही तर आमचीच मुस्कटदाबी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे यांच्या दादागिरीवरून आज सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विषय बदलण्याचा प्रयत्न करत असताना पत्रकारांनी आमदारांच्या दादागिरीवरील प्रश्न महत्त्वाचा नाही का असा पवित्रा घेतल्या ही तर आमचीच मुस्कटदाबी असे म्हणून फडणवीस यांनी हतबलता दाखवली.
  • आज नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी चहापानाचा कार्यक्रम झाला.

मुंबई :  शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे यांच्या दादागिरीवरून आज सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विषय बदलण्याचा प्रयत्न करत असताना पत्रकारांनी आमदारांच्या दादागिरीवरील प्रश्न महत्त्वाचा नाही का असा पवित्रा घेतल्या ही तर आमचीच मुस्कटदाबी असे म्हणून फडणवीस यांनी हतबलता दाखवली. (Journalists asked Fadnavis Shinde a question about MLA Bangar and Surve.)

आज नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी चहापानाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधांच्या आरोपांना उत्तर दिली. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार का टाकला या संदर्भात सात पानी पत्र सरकारला पाठवले. त्याला या पत्रकार परिषदेत उत्तर देण्यात आली. 

अधिक वाचा : 'सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला?'

यावेळी पत्रकारांनी आमदार संतोष बांगर यांनी कामगारांना देण्यात येणाऱ्या मिड डे मीलच्या मॅनेजरला केलेली मारहाण आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्याला नडणाऱ्याचे हात तोडा ते जमले नाही तर तंगडी तोडा अशी भाषा वापरल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही अशा कोणत्याही कृतीचे समर्थन करत नाही. कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे उत्तर दिले. पण त्यावर पत्रकारांचे समाधान झाले नाही. 

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की आमदारांच्या दादागिरीबाबत कोण अजित पवार बोलले का. त्या सत्तेची मस्ती आली आहे का, अजितदादांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले. तडीपाऱ्या केल्या. घरातून उचलून आणले. पक्षात सामील व्हा, तडीपारी रद्द करतो असे काम केले. तर सत्तेची मस्ती कोणामध्ये होती तुम्हीच सांगा. आम्ही सत्तेचा गैरवापर करणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

अधिक वाचा : खासगी नोकरी करणाऱ्यांसच्या पगारात होणार इतकी मोठी वाढ

त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून विषय बदलण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, तुमचे प्रश्न उत्तर होतीलच पण मला एक मुद्दा स्पष्ट करायचा की अनेक प्रसार माध्यमांनी ही बातमी केली आणि अजितदादाही बोलले की मंत्रीमंडळात 80 टक्के वाटा भाजपला आणि 20 टक्के वाटा हा शिवसेनेला देण्यात आला. तर तुमच्यासमोर फिगर मांडतो आहे. त्यावर पत्रकारांनी फडणवीसांना थांबले आणि म्हटले की सर हा विषय महत्त्वाचा आहे. संतोष बांगर यांच्यावर कारवाई होणार की नाही.  त्यावर फडणवीस म्हणाले, हा विषय नको का...  ही तर आमचीच मुस्कटदाबी आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले अरे, तुम्ही जिकडे बोलायला पाहिजे तिकडे बोलत नाही.  

 
Live - पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर LIVE - पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद - विरोधी पक्षांचा चहापानावर बहिष्कार -उपमुख्यमंत्री Posted by RNO - Right News Online on Tuesday, August 16, 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी