JC to Deshmukh and PC to Waze अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी तर सचिन वाझेला पोलीस कोठडी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 06, 2021 | 16:15 IST

खंडणी वसुली आणि पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे याला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Judicial Custody to Anil Deshmukh and Police Custody to Sachin Waze
अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी तर सचिन वाझेला पोलीस कोठडी 
थोडं पण कामाचं
  • अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर सचिन वाझेला पोलीस कोठडी
  • ऋषीकेश देशमुखांना अटकपूर्व जामीन नाहीच!
  • सचिन वाझे याला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी

Judicial Custody to Anil Deshmukh and Police Custody to Sachin Waze । मुंबईः खंडणी वसुली आणि पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. देशमुखांच्या नऊ दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी ईडीच्यावतीने करण्यात आली. मात्र दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून न्यायालयाने देशमुखांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याआधी खंडणी वसुली प्रकरणात मुंबई पोलीस दलातून निलंबित केलेल्या सचिन वाझे याला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. वाझे मुंबई पोलीस दलाच्या क्राईम ब्रँचच्या कोठडीत राहणार आहे.

ऋषीकेश देशमुखांना अटकपूर्व जामीन नाहीच!

पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात ईडीने चौकशीला हजर होण्यासाठी अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांना समन्स बजावले आहे. हे समन्स मिळताच न्यायालयात धाव घेऊन ऋषीकेश यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांच्या अर्जाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ठेवली आहे. सध्या ऋषीकेश यांच्याकडे अटक टाळण्यासाठी कोणतेही न्यायालयीन संरक्षण नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी