Jumbo Megablcok : रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द

मध्य रेल्वेवर शनिवारी १८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. jumbo megablock on central railwa thane to diva station

mega block
मेगा ब्लॉक 
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वेवर शनिवारी १८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक
  • पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी हा मेगाब्लॉक
  • मेगाब्लॉक दरम्यान कळवा आणि मंब्रा स्थानकावर लोकल थांबणार नाही

Jumbo Megablcok : मुंबई: मध्य रेल्वेवर (central railway) शनिवारी १८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक (megablcok) असणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान कळवा आणि मुंब्रा स्थानकावर लोकल थांबणार नाही. (jumbo megablock on central railwa thane to diva station)

ठाणे ते दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रिववारी सकाळी ८ ते सोमवारी पहाटे २ वाजल्यापासून असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान कळवा आणि मंब्रा स्थानकावर कुठलीही लोकल थांबणार नाही. प्रवाशांनी कोपर, ठाकुर्ली, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून लोकल पकडावी असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अधिक बस सोडण्यात आल्या आहेत असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. मेगाब्लॉकमुळे १४ एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन एक्सप्रेस या फक्त पुण्यापर्यंत धावतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी