मुंबई : शिवसेनेत बंड पुकारल्याने राजकीय भूकंप आला आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. त्याच दरम्यान बंडखोर आमदारांपैकी एका आमदाराची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आणि त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shiv Sena rebel MLA Shahaji Bapu Patil) हे 'काय झाडी..., काय डोंगर... काय हॉटेल' या डायलॉगने चांगलेच चर्चेत आले. हेच शहाजीबापू पाटील एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
शिवसेनेचे सांगोला येथील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील हे एका अपघातानून थोडक्यात बचावले आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आकाशवाणी आमदार निवास येथील रूममधील छताचा स्लॅब अचानक कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शहाजीबापू पाटील हे रूममध्ये असतानाच ही घटना घडली.
हे पण वाचा : सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांची भेट; शिंदे गटातील यामिनी जाधव, सरनाईकांवरील ईडीची पीडा टळणार?
या दुर्घटनेचे फोटोजही समोर आले आहेत. या फोटोजमध्ये दिसत आहे की, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या रूममधील बेडवर सिलिंगचा स्लॅब कोसळल्याचं दिसत आहे. तर त्यासोबतच जमीनीवर सुद्धाही काही स्लॅबचा ढिगारा पडल्याचं फोटोजमध्ये दिसत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. आमदार शहाजीबापू पाटील हे अगदी सुखरूप आहेत.
हे पण वाचा : उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के; सेनेचा गड ढासळला, शिवसेनेला मोठं खिंडार
आमदार शहाजीबापू पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर सर्व बंडखोर आमदार हे गुवाहाटी येथील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्याच दरम्यान शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार शहाजीबापू पाटील हे आपल्या एका कार्यकर्त्यासोबत फोनवर बोलत आहेत. त्याच्यासोबत बोलदाना शहाजीबापू पाटील यांनी एक डायलॉग म्हटला. 'काय झाडी..., काय डोंगर... काय हॉटेल' या डायलॉगने चांगलेच चर्चेत आले.
कार्यकर्ता - हॅलो
शहाजीबापू पाटील - हॅलो
कार्यकर्ता - नेते नमस्कार
शहाजीबापू पाटील - नमस्कार.. नमस्कार
कार्यकर्ता - कुठं हायत नेते... तीन दिवस झाले फोन लावतोय लागतच नाही
शहाजीबापू पाटील - आम्ही सध्यचा गुवाहाटीत आहोत
कार्यकर्ता - बरं बरं...
शहाजीबापू पाटील - काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल ओकेमध्ये आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.