Kalank Chaturthi 2022: कधी आहे कलंक चतुर्थी?, कलंक चतुर्थीला चंद्राकडे बघणे का टाळावे?, काय आहे 'तो' शाप?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 03, 2022 | 11:54 IST

Ganesh Chaturthi Shubh Muhurat: हिंदू पंचांगानुसार भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी किंवा कलंक चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी चंद्राकडे बघणे अशुभ समजले जाते. याच कारणामुळे या तिथीला कलंक चतुर्थी असे म्हणतात. 

Kalank Chaturthi 2022
कधी आहे कलंक चतुर्थी?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हिंदू पंचांगानुसार भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी किंवा कलंक चतुर्थी असे म्हणतात
  • यंदाच्या वर्षी (२०२२) कलंक चतुर्थी मंगळवार ३० ऑगस्ट रोजी
  • असं म्हणतात की कलंक चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघितल्यास संबंधित व्यक्तीवर खोटा आळ (खोटा आरोप) येतो

Ganesh Chaturthi Shubh Muhurat: हिंदू पंचांगानुसार भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी किंवा कलंक चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी चंद्राकडे बघणे अशुभ समजले जाते. याच कारणामुळे या तिथीला कलंक चतुर्थी असे म्हणतात. 

Egypt Sun Temple: इजिप्तमध्ये ४५०० वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर, चार गायब मंदिरांपैकी एक असल्याची शक्यता

यंदाच्या वर्षी (२०२२) कलंक चतुर्थी मंगळवार ३० ऑगस्ट रोजी आहे. असं म्हणतात की कलंक चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघितल्यास संबंधित व्यक्तीवर खोटा आळ (खोटा आरोप) येतो. यातून संबंधित व्यक्तीची नाहक बदनामी होते. 

Shiv Temple: भक्तांना दर्शन देऊन गायब होते हे शिवमंदिर, शिवपुराणातही आहे उल्लेख

असे म्हणतात की श्रीकृष्णाने कलंक चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघितले यामुळे कृष्णावर चोरीचा आळ आला होता. जाणून घेऊ कलंक चतुर्थीची पुराणकथा....

माता पार्वतीने एक मूर्ती तयार करून त्या मूर्तीला गणेश असे नाव दिले. माता पार्वती स्नानासाठी गेली आणि तिने घराचे रक्षण करण्याची जबाबदारी गणेशाकडे सोपविली. भगवान शंकर आले त्याच सुमारास घरी आले. गणेशाने शंकराला अडविले हे पाहून रागावलेल्या शंकराने त्रिशूळ वापरून गणेशाचं डोकं उडवलं. नेमकी त्याचवेळी माता पार्वती तिथे आली. तिने मोठ्याने विलाप सुरू केला आणि गणेशाला पुन्हा जीवंत करा असा आग्रह शंकरापुढे धरला. अखेर शंकराने हत्तीचे डोकं आणून ते गणेशाच्या धडावर बसविले आणि गणेशाला जीवंत केले. नव्या रुपातील गणेशाला बघून चंद्र हसू लागला. चंद्राला हसताना बघून गणेशाने त्याला शाप दिला. यानंतर चंद्राने गणेशाची माफी मागितली.

चंद्राने माफी मागितल्यानंतर गणेशाने त्याला उःशाप दिला. दर महिन्याला एक दिवस चंद्र पूर्ण रुपात दिसेल आणि त्यावेळचे त्याचे सौंदर्य बघणाऱ्यांना मोहून टाकू शकेल. आजही दर महिन्यात फक्त पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे महिन्यात एकदाच चंद्र पूर्ण रुपात दिसतो इतर चंद्र पूर्ण रुपात दिसत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी