कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२२

kalnirnay sanskrutik diwali 2022 diwali issue review : कालनिर्णयच्या दिवाळी अंकाचे हे तिसावे वर्ष आहे. कवयित्री नीरजा यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले. यंदाच्या अंकाची सुरुवात डॉ. दत्तात्रय केतकर लिखित 'मराठ्यांचे अजस्त्र आरमार' या लेखाने झाली आहे.

kalnirnay sanskrutik diwali 2022 diwali issue review
कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२२ 
थोडं पण कामाचं
  • कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२२
  • दिवाळी अंकाचे परीक्षण
  • दिवाळी अंकाची सुरुवात डॉ. दत्तात्रय केतकर लिखित 'मराठ्यांचे अजस्त्र आरमार' या लेखाने

kalnirnay sanskrutik diwali 2022 diwali issue review : कालनिर्णयच्या दिवाळी अंकाचे हे तिसावे वर्ष आहे. कवयित्री नीरजा यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले. यंदाच्या अंकाची सुरुवात डॉ. दत्तात्रय केतकर लिखित 'मराठ्यांचे अजस्त्र आरमार' या लेखाने झाली आहे. यात सागरी आरमाराचा कोणताही अनुभव नसताना शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार किती ताकदीचे होते याची माहिती सोप्या आणि मोजक्या शब्दात नेटकी दिली आहे. 

२०२१ सालचा प्रतिष्ठित असा 'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त आणि प्राकृतिक विचारधारा असणारे लेखक दामोदर मावजो यांचा साहित्यप्रवास मांडला आहे, सखाराम शेणवी बोरकर यांनी 'गोव्याच्या मातीचा सन्मान!' या लेखातून. 'द न्यू यॉर्कर'ला घडवणारे शैलीदार संपादक विल्यम शॉन यांची पत्रकारिता कशी घडली हे सांगत आहेत निळू दामले.

पुण्याच्या रुपी बॅंकेला दणका! बॅंकेचे लायसन्स रद्दच राहणार, अर्थमंत्रालयाचा निर्णय

तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, मोहात पडून करू नका हे काम

हंसाबाई वाडकर या अभिनेत्रीचा आयुष्यपट श्रीकांत बोजेवार यांची 'हंसाबाईनी सोडलेल्या कोन्या जागा' या लेखातून दिला आहे. लीना पाटणकर यांनी हिंदुस्तानी संगीतातील प्रतिभावंत गायक संगीत दिग्दर्शक कृष्णाजी फुलंब्रीकर यांचा कलाप्रवास सादर केला आहे. अभिनेत्री देविकाराणीचे चरित्र उलगडले आहे, रोशन दासगुप्ता यांनी. 

प्रकाश चांदे यांनी ५० चे दशक गाजवणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री म्हणजे नंदा हिच्यावर चिरतरुण 'बेबी' हा लेख लिहिला आहे. चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्याविषयी राजेंद्र पाटील यांनी 'नग्न सत्याचा शोधक फ्रान्सिस न्यूटन सुझा' हा लेख लिहिला आहे. 

'काडेपेटीवरच्या चित्राची वेगळी कहाणी' सांगत आहेत, रविप्रकाश कुलकर्णी. रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायला शिकवणारा चित्रकार, व्यंगचित्रकार ख्रिस्तोफर निमन याची ओळख करून देत आहेत, प्रशांत कुलकर्णी. 

गुजरातमधील लोककला संगीतातील एक अग्रणी नाव असणाऱ्या धनवाई काराबद्दल सांगत आहेत, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे. गुप्तचर, हेर कसे काम करतात हे सांगत आहेत, वसंत देशमुख. 

दीपक करंजीकर यांचा 'केनेडींच्या हत्येमागचे विलक्षण ताणेबाणे' हा रहस्यमय लेख वाचकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याशिवाय राहत नाही. डॉ. सखाराम मालशे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे, डॉ. मीना वैशंपायन यांनी. वन्य प्राण्यांच्या जीवनाबद्दल सांगत आहेत, सुरेशचंद्र वारघडे. दगडांवर रेघोट्या ओढून आपली करमणूक करून घेणारे चिनी पूर्वज आणि आजच्या जमान्यात विरंगुळा म्हणून आपल्या कलेचे समाजमाध्यमावर प्रदर्शन करणारे चिनी तरुण यांच्यातील साम्य दाखवून दिले आहे सुवर्णा साधू यांनी.

भटक्या जमातीत जन्म घेणे ही त्या व्यक्तीची चूक आहे का? हे विचारत आहेत दिलीप डिसोझा 'सद्रक्षणाय की सद्भक्षणाय ?' या लेखातून. यंदाच्या अंकात 'मंदिर चौक' ही मधुकर धर्मापुरीकर यांनी अनुवाद केलेली, तसेच 'पेस्ट्री दुकानातील चोरी' ही प्रणव सखदेव यांनी अनुवादित केलेली कथा वाचायला मिळेल. तर कविता विभाग संपादित केला आहे, जेष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी. पाकनिर्णय २०२३ स्पर्धेतील परीक्षकांचे अनुभव आणि १८ उत्तेजनार्थ विजेत्या पाककृती, राशिभविष्य आणि विनोदी किस्सेही या अंकात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी