Karnataka Bypoll Results 2019: देवेंद्र फडणवीस यांचा महाविकासआघाडीला खोचक टोला 

मुंबई
Updated Dec 09, 2019 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

  Karnataka Bypoll Results 2019: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल कर्नाटक भाजपचे अभिनंदन केले आहे. 

Karnataka Bypoll Results 2019 Devendra Fadnavis tweets maharashtra vikas aghadi political news in marathi google newsstand
Karnataka Bypoll Results 2019: देवेंद्र फडणवीस यांचा महाविकासआघाडीला खोचक टोला   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  एका रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पाठिंबा घेऊन सरकार बनविणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमधील पोटनिवडणुकीच्या आडून महाराष्ट्र विकास आघाडीला टोला लगावला आहे. कर्नाटकात भाजपने १५ पैकी ६ जागांवर विजय मिळवला असून इतर ६ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस १ जागेवर विजय मिळला असून एका जागेवर आघाडीवर आहेत. अपक्षाने १ जागेवर विजय मिळवला आहे. तर जेडीएस दोन जागांवर पिछाडीवर आहे. 
  
 कर्नाटकमध्ये भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन ट्विट केले आहेत. यात ते म्हणतात, जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात, जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात, त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते, याचे उदाहरण आज कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे. जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहजी, मुख्यमंत्री श्री येदियुरप्पाजी आणि कर्नाटक तसेच देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.


 
 महाराष्ट्राच्या जनतेनेही असेच भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले होते. तर महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून जनतेचा अपमान केला आहे. तसेच संधीसाधूपणा केला आहे. अशा लोकांना जनता ही पहिली संधी मिळताच धडा शिकवते. याचे उदाहरण कर्नाटकाने दाखवून दिले आहे. जनादेश आणि जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत, असा टोला महाराष्ट्र विकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लगावला आहे. 


 
 तसेच राज्यात भविष्यात असेच काहीसे होणार असे संकेतही या निमित्ताने दिले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी येडियुरप्पा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच कर्नाटकतील भाजपच्या कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले आहे. 
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी