कर्नाटकच्या घटनेचे पडसाद; शिवाजी पार्कात शिवसैनिकांकडून आंदोलन

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 19, 2021 | 13:52 IST

Shiv Sena Agitation : कर्नाटकच्या (Karnataka) घटनेचे पडसाद आता मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar) परिसरातही पडू लागले आहेत. शिवसैनिकांकडून (ShivSena Worker) या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

Shivsena Worker Agitation
शिवाजी पार्कात शिवसैनिकांकडून आंदोलन  |  फोटो सौजन्य: Indiatimes

Shiv Sena Agitation : मुंबई : कर्नाटकच्या (Karnataka) घटनेचे पडसाद आता मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar) परिसरातही पडू लागले आहेत. शिवसैनिकांकडून (ShivSena Worker) या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) शिवसैनिकांनी आंदोलन करण्यात आला आहे. माँसाहेब यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे.

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. सदा सरवणकर, मनीषा कायंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यासोबत अनेक शिवसैनिक याठिकाणी उपस्थित आहेत. कर्नाटकातील घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आमदार सदा सरवणकर, आमदार मनीषा कायंदे शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत. 

बंगळुरूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांकडून करण्यात आली. अशा समाज कंटकांवर कठोरातील कठोर कारवाई केली गेली पाहिजे. केंद्र सरकारने देखील लक्ष देऊन यावर कारवाई केली पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही बाब छोटी असल्याचे बोलले आहे. परंतु अशा लोकांमुळेच हे समाजकंटक वाढत असल्याची टीका शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. कन्नडीकांचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी