Karnataka Mangoes are sold as Devgad Hapus, check this way : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर राज्यांतून आंब्यांची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या चवीची सर इतर आंब्यांना नाही. यामुळे हापूस मोठ्या दराने विकला जातो. पण झटपट नफा कमावण्यासाठी काही व्यापारी परराज्यांतील आंबा कोकणातील हापूस असल्याचे सांगत ग्राहकांची फसवणूक करतात. हे प्रकार थांबवावेत, नाहीतर दोषींवर कारवाई करू; असा इशारा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला व्यापाऱ्यांना दिला आहे.
प्रामुख्याने रस्त्यावर, लागणाऱ्या गाड्या, आंब्याची दुकाने येथे परराज्यांतील आंबा कोकणातील हापूस असल्याचे सांगत ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण जास्त आहे.
कर्नाटक, केरळ येथील आंबे हापूसपेक्षा वेगळ्या चवीचे असतात. कर्नाटकचे आंबे वरवर बघता कोकणातील हापूससारखे दिसत असल्याने ग्राहकांची फसगत होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या आंब्यांना सरासरी 150 किलो हा दर मिळतो. पण काही व्यापारी पेटीत पॅक करून कर्नाटकचा आंबा हापूस सांगून दोन ते अडीच हजार रुपयांना विकत आहेत.
परराज्यांतून येणारा आंबा त्या राज्यातील आंब्याच्या आणि त्याच्या जातीच्याच नावाने विकला जावा. जर परराज्यातील आंबा त्याच्या नावाने तसेच त्याच्या ठराविक जातीने न विकता हापूस म्हणून विकला आणि या प्रकाराची तक्रार बाजार समितीकडे आली तर तपासणी करून कारवाई केली जाईल, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितले. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला बाजार समितीच्या कोणत्याही सेवेचा लाभ घेता येणार नाही. ग्राहक संबंधित व्यापाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र असेल.
या ब्रँडची मूळ नावं माहिती आहेत का?
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.