Dhananjay Munde : करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या आईचा खून कोणी केला या विषयी रेणू शर्मा पुरावे देणार होती

Karuna sharma on minister dhananjay munde : धनंजय मुंडे हे स्वतः १० मोबाईल क्रमांक वापरत आहेत. एवढे मोबाईल क्रमांक धनंजय मुंडे कशासाठी लागतात, असा सवाल करुणा यांनी केला. एखादी वाईट काम करणारी महिलादेखील इतके क्रमांक वापरत नाही मग धनंजय मुंडेच इतक्या मोबाइल क्रमांकाचा वापर का करतात, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला.

Karuna sharma on minister dhananjay munde
आईचा खून कोणी केला या विषयी रेणू शर्मा पुरावे देणार होती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धनंजय मुंडे यांनी खंडणीचा खोटा आरोप करुन माझ्या बहिणीला तुरुंगात डांबले - करूणा शर्मा
  • धनंजय मुंडे हे खोट्या या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. - करुणा शर्मा
  • आईचा खून कोणी केला या विषयी रेणू शर्मा पुरावे देणार होती. करूणा शर्मा

मुंबई : धनंजय मुंडे यांनी खंडणीचा खोटा आरोप करुन माझ्या बहिणीला तुरुंगात डांबले असल्याचा आरोप गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा यांनी देखील याअगोदर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, करुणा शर्मा यांची बहिण रेणू शर्मा यांनी मागील वर्षभरापासून धनजंय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, माझी बहिण रेणू शर्मा पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा खुलासा करणार होती मात्र, तिला पोलिसांनी एका खोट्या गुन्ह्यात अटक केली असल्याने अद्याप पर्यंत तो खुलासा केला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे 

धनंजय मुंडे हे खोट्या या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. - करुणा शर्मा

पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, धनंजय मुंडे हे स्वतः १० मोबाईल क्रमांक वापरत आहेत. एवढे मोबाईल क्रमांक धनंजय मुंडे कशासाठी लागतात, असा सवाल करुणा यांनी केला. एखादी वाईट काम करणारी महिलादेखील इतके क्रमांक वापरत नाही मग धनंजय मुंडेच इतक्या मोबाइल क्रमांकाचा वापर का करतात, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला. धनंजय मुंडे हे खोट्या या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप देखील करूणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.  

रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. - करूणा शर्मा

धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांचे देखील संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला. या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा धक्कादायक आरोप करूणा शर्मा यांनी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी