IANS Vikrant : किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने अटक पूर्व जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक

आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या आण पुत्र नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने सोमय्या पिता पुत्रांच जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे दोघांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

kirit somaiya
किरीट सोमय्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या आण पुत्र नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
  • कोर्टाने सोमय्या पिता पुत्रांच जामीन अर्ज फेटाळला आहे.
  • त्यामुळे दोघांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

Kirit Somaiyya : मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या आण पुत्र नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने सोमय्या पिता पुत्रांच जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे दोघांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी सोमय्या यांनी पैसे गोळा केले आणि ते पैसे राजभनवकडे सुपुर्द करण्याऐवजी भाजपकडे दिले होते. हे पैसे कुठे गेले आणि हे पैसे कुणाकडे दिले याची चौकशी करण्यासाठी पोलिसांना सोमय्या यांचा ताबा द्यावा अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. कोर्टाने सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळला असून दोघांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. 

आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी ५७ कोटी रुपये जमा करण्यात आले होते, हे पैसे राजभवनकडे आलेच नाही अशी माहिती राजभवनने अधिकृत पत्रक काढून दिली. तेव्हा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हे पैसे गेले कुठे असा सवाल केला. तेव्हा किरीट सोमय्या यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी हे पैसे राजकीय पक्षाला दिल्याचे सांगितले. ही घटना अतिशय गंभीर असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. तसेच या पैश्यांची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा ताबा पोलिसांना द्यावा आणि त्यांच जामीन अर्ज फेटाळून लावा अशी मागणी घरत यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी जामिनासाठी काही कागदपत्र दाखल केली होती. या कागदपत्रांनुसार सोमय्या यांनी हा गुन्हा जवळ जवळ कबुल केला होता अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.


काय म्हणाले होते सरकारी वकील

शासनातर्फे अटकपूर्वे जामीन अर्जाला विरोध करण्यात आला आहे. मिळलेल्या तक्रारीनुसार चर्चगेट स्थानकासह अनेक रेल्वे स्थानकावर आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी पैसे जमा करण्यात आले. राजभवनाकडे असा कुठला निधी जमा झाला का याची विचारणा करण्यात आली तेव्हा राजभवनाने असा कुठलाही निधी मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आयएनएस विक्रांतसाठी एकूण ५७ कोटी रुपये जमा करण्यात आले होते, याची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा पोलिसांना ताबा गरजेचा आहे. आरोपी व्हिडीओ आणि छायाचित्रांमध्ये आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा करताना दिसत आहेत, परंतु त्यांनी कुणालाही पावती दिलेली नाही. हा निधी गोळा करण्यासाठी आरोपींनी कुठलीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही असे प्रश्न उपस्थित केले गेले. हे पैसे भाजपला दिल्याचे आरोपींनी म्हटले आहे असेही घरत म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी