Kirit Somaiya यांनी टाकला नवा बॉम्ब, ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ

BJP Vs Uddhav Thackeray: भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे.

Kirit Somaiya Claim mla Ravindra Waikar did Scam Maharashtra BMC Land
Kirit Somaiya यांनी टाकला नवा बॉम्ब, ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरे गटातील आमदारावर किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप
  • रवींद्र वायकर यांनी BMC जमीन घोटाळा केला
  • महापालिकेच्या जागेत पंचतारांकित हाॅटेल

मुंबई :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणखी एक निकटवर्तीय आमदार अडचणीत येऊ शकतो. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की, ठाकरे यांचे सहकारी आणि त्यांचे आमदार रवींद्र वायकर यांनी सुमारे 500 कोटींचा घोटाळा केला आहे. (Kirit Somaiya Claim mla Ravindra Waikar did Scam Maharashtra BMC Land )

अधिक वाचा : Old Pension Scheme: सरकारचा मोठा निर्णय!, कर्मचाऱ्यांसाठी लागू केली जुने पेन्शन !, कसा फायदा घ्यावा

सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिकेने क्रीडांगण आणि उद्यानाच्या नावावर ठेवलेल्या जागेवर आमदार वायकर हे स्वत:च्या नावावर पंचतारांकित हॉटेल करत आहेत. त्याला मातोश्री पंचतारांकित हॉटेल असे नाव देता येईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे सर्व घडले. यात महापालिकेचाही मोठा हात आहे.

अधिक वाचा : Today Horoscope 5 March : या राशींसाठी आजचा दिवस असणार खूप खास, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

आरोप काय?

मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रवींद्र वायकर हे महापालिकेच्या क्रीडांगण आणि उद्यानासाठी सुमारे दोन लाख चौरस फूट जागा ताब्यात घेऊन पंचतारांकित हॉटेल उभारत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते सोमय्या यांनी सांगितले की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुंबई महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारकडे केली आहे, ज्यांच्या महापालिकेने फेब्रुवारी 2023 रोजी रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या या जमिनीवर पंचतारांकित हॉटेल कोणत्या अधिकाराने बांधले जात आहे, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.

अधिक वाचा : Stock Market: पुढच्या वर्षभरात 'हे' 10 स्टॉक्स तुम्हाला करू शकतात मालामाल, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
काय मागणी केली?

सोमय्या यांनी सांगितले की, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरच मातोश्री आर्ट्स अँड स्पोर्ट्स ट्रस्टच्या नावावर महापालिकेची जमीन आहे, मात्र उद्धव ठाकरे यांचे खास रवींद्र वायकर हे वर्षानुवर्षे हॉटेल म्हणून वापरत आहेत. आता त्याच महापालिकेच्या जमिनीवर घोटाळा करून पंचतारांकित हॉटेल उभारले जात आहे. 500 कोटींच्या या घोटाळ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जमिनीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे काम तातडीने थांबवावे, अशी मागई सोमय्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी