Kirit Somaiya : शिवसेना पक्ष लवकरच संपणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा

शिवसेना लवकरच इतिहास जमा होणार अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याचे किरीट सोमय्या यांनीच आरोप केले होते. त्यावरून राऊत आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती.

kirit somaiya
किरीट सोमय्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना लवकरच इतिहास जमा होणार अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
  • पत्राचाळ घोटाळ्याचे किरीट सोमय्या यांनीच आरोप केले होते.
  • त्यावरून राऊत आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती.

Kirit Somaiya : मुंबई : शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (Enforcement Directorate) अटक केली आहे. यावर शिवसेना लवकरच इतिहास जमा होणार अशी टीका भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याचे (Patrachawl Scam) किरीट सोमय्या यांनीच आरोप केले होते. त्यावरून राऊत आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. (kirit somaiya predict shivsena will vanish after sanjay raut ed arrest)

किरीट सोमय्या झी २४ तास या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार शोधावे लागत आहेत. शिवसेना लवकरच इतिहासात जमा होणार असेही सोमय्या म्हणाले. 

अधिक वाचा :  ED seized cash from Sanjay Raut house : एकनाथ शिंदेंविरोधात कटकारस्थान करण्यासाठी ते पैसे ठेवले असतील- केसरकर

सर्व प्रादेशिक संपणार

फक्त किरीट सोमय्या यांनीच नव्हे तर भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील अशी भविष्यवाणी केली आहे. नड्डा एका सभेत म्हणाले की, भाजप ही एक विचारसरणी घेऊन जाणारा पक्ष आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष उभा केला आहे. त्यामुळे भाजपपुढे कुठलाही पक्ष टिकणार नाही आणि देशात फक्त भाजप उरेल असेही नड्डा म्हणाले. 

अधिक वाचा : Sanjay Raut Arrest:संजय राऊतांना ईडीकडून अटक, अटकेनंतरचा सामनाचा पहिला अग्रलेख; राज्यपालांवर निशाणा

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २००७ साली पत्राचाळ जमीन घोटाळ्याची सुरूवात झाली. प्रवीण राऊत, गुरूष आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी म्हाडासोबत हा जमीन घोटाळा केला आहे. म्हाडाने पत्राचाळीच्या पुर्नविकासाचे कंत्राट गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे दिले होते. यात १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत हे या प्रकरणी आरोपी आहेत. या कन्सट्रक्शन कंपनीने चाळीच्या लोकांना धोका दिल्याचा आरोप केला जात आहे. गुरू कन्स्ट्रक्शन कंपनी प्रवीण राऊत यांची असून पत्रा चाळीत ३ हजार फ्लॅट बनवण्याचे कंत्राट त्यांच्या कंपनीला मिळाले होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट हे चाळीच्या रहिवाशांना मिळणार होते. परंतु पत्राचाळीची जमीन एका खासगी बिल्डरला विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : Sanjay Raut: भावाच्या अटकेनंतर आमदार सुनील राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ''आम्ही न्यायालयीन..

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी