kirit Somaiya Tweet : दिवाळीनंतर सोमय्यांचे फटाके फुटणार का नवाब मलिक करणार भांडाफोड

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 31, 2021 | 19:38 IST

kirit Somaiya Tweet : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला इशारा दिला

kirit Somaiya Tweet
दिवाळीनंतर सोमय्यांचे फटाके फुटणार का मलिक करणार भांडाफोड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयाचे तीन अशा एकूण सहा घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार - सोमय्या
  • सोमय्यांच्या ट्विटला नवाब मलिक यांचे प्रतित्त्युर

kirit Somaiya Tweet : मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला इशारा दिला. दिवाळीनंतर फटाके फोडणार असं ट्विट करत सोमय्यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. सोमय्यांच्या या ट्विटला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांविरोधात आघाडी उघडली आहे.

उपमुख्यमंत्री  (Deputy Chief Minister ) अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh), परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयाचे तीन अशा एकूण सहा घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केली आहेत. परंतु सोमय्यांच्या या इशाऱ्यानंतर आता नवाब मलिक आक्रमक झाले आहेत. आपण भाजपच्या नेत्यांचा भांडाफोड करणार असल्याचं नवाब मलिक म्हणत आहेत. यामुळे कोणता खुलासा मलिक करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

आपण मोठा पर्दाफाश केल्यानंतर भाजपवाले तोंड दाखवू शकणार नाहीत असंही मलिक यांनी म्हटले आहे. ते सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. दिवाळीनंतर आपण सहा घोटाळे बाहेर काढणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये मंत्र्यांची नावं जाहीर केली नसल्याने हे मंत्री नेमके कोण, याची चर्चा रंगली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी