मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूर दौरा

मुंबई
भरत जाधव
Updated Sep 23, 2021 | 10:05 IST

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा 28 सप्टेंबरला कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. 27 तारखेला मुंबईहून निघून 28 तारखेला कोल्हापुरला पोहोचणार आहेत.

Kirit Somaiya
किरीट सोमय्या   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा 28 सप्टेंबरला कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
  • 27 तारखेला मुंबईहून निघून 28 तारखेला कोल्हापुरला पोहोचणार आहे.
  • सोमय्यांना कोल्हापुरात प्रवेश देण्यास मुरगूड नगरपालिका सहमत

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे 28 सप्टेंबरला कोल्हापूरला जाणार आहे. तिथे गेल्यावर मुश्रीफ यांच्याविरोधात कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना कराडमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता सोमय्यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा 28 सप्टेंबरला कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. 27 तारखेला मुंबईहून निघून 28 तारखेला कोल्हापुरला पोहोचणार आहेत. तिथे पोहोचल्यानंतर कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे. याआधी दोनदिवसांपूर्वीच 20 तारखेला किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले होते. महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवानाही झाले होते. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होईल म्हणून जिल्हाबंदीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सोमय्यांना कऱ्हाड स्थानकावर ताब्यात घेतले होते. 

दरम्यान, किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना माफी मागण्यासाठी 72 तासांची मुदत दिली होती. 72 तास उलटल्यानंतर सोमय्यांनी काही अद्याप माफी मागितली नाही. त्यामुळे आता अनिल परब यांनी सोमय्यांच्याविरोधात रितसर कायदेशीर पाऊल उचलले आहे.

सोमय्यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहेत. सोमय्यांचा नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ठराव मंजूर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी