Kirit Somaiya will expose illegal activities of Jay Ajit Pawar : मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार चर्चेत आहेत. जय पवार यांचे बेकायदा व्यवहार उघडकीस आणणार अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे नेता किरीट सोमय्या यांनी केली आहे.
अजित पवार यांची १०५५ कोटींची संपत्ती बेनामी घोषित झाली आणि जप्त झाली. आता जय पवार यांच्या बेकायदा आर्थिक व्यवहारांची माहिती लवकरच जगजाहीर करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. बेनामी गुंतवणूक करून, कंपन्यांचे जाळे निर्माण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची खरेदी केली. सर्व नियमांचे उल्लंघन करून पवार यांनी स्वत:च हा कारखाना स्वत:ला विकला, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली. ही चौकशी सुरू असतानाच किरीट सोमय्या यांनी जय पवार यांच्या बेकायदा आर्थिक व्यवहारांची माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामुळे आता किरीट सोमय्या काय माहिती देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.