चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ अडचणीत, एसीबीकडून गुन्हा दाखल

मुंबई
Updated Feb 27, 2021 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. 5 जुलै 2016 रोजी 4 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक आणि नंतर निलंबित केले गेले होते.

Chitra Wagh
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ अडचणीत, लाच घेतल्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भाजपाच्या सत्ताकाळातच झाली चौकशी
  • पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवल्याने सूडबुद्धीने कारवाई?
  • सचिन सावंत यांचा ट्विटरवरून हल्लाबोल

मुंबई: भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती (husband) किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाने (Anti-Corruption Bureau) गुन्हा दाखल केला आहे. ते मुंबईच्या (Mumbai) परळ (Parel) इथल्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून काम करत असताना 5 जुलै 2016 रोजी 4 लाख रुपयांची लाच (bribe) घेताना त्यांना अटक (arrest) आणि नंतर निलंबित (suspend) करण्यात आले होते. याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांच्या सेवा कालावधीतील संपत्तीची (property) खुली चौकशीही (open investigation) केली होती.

भाजपाच्या सत्ताकाळातच झाली चौकशी

किशोर वाघ यांच्या पत्नी चित्रा वाघ या सध्या भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी भाजप सरकारच्या कार्यकाळातच सुरू करण्यात आली होती. पतीवर गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की त्यांना किंवा त्यांच्या पतीला कोणतीही पूर्वसूचना न देता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आलेली नाही. तसेच कायदेशीर लढा देण्यासाठी आपण सज्ज असल्याचेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवल्याने सूडबुद्धीने कारवाई

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चित्रा वाघ या आक्रमक पद्धतीने न्याय मागत असल्याने सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मागेच बंद झालेली प्रकरणे पुन्हा उकरून काढली जात आहेत. ही सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच चित्रा वाघ यांच्यासोबत असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले आहे.

सचिन सावंत यांचा ट्विटरवरून हल्लाबोल

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किशोर वाघ प्रकरणी ट्वीट करून भाजपावर हल्लाबोल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की हा गुन्हा 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला होता आणि याची खुली चौकशी 2016 साली भाजपा सरकार असताना चालू झाली होती. तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की चित्रा वाघ यांनी जर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला नसता तर हा गुन्हा तेव्हाच दाखल झाला असता. त्यांनी भाजपावर राजकीय दिरंगाईचा आरोपही केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी