Guidlines of School Reopen : अशी असू शकते शाळा सुूरू झाल्यावर कोविड संदर्भातील नियमावली 

Guidlines of School Reopen in Maharashtra :  गेल्या सुमारे पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या ऑफलाइन प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत.

 know the rules regarding covid after school repoen of class 1st to 12th in Maharashtra
शाळा सुूरू झाल्यावर कोविड संदर्भातील नियमावली  
थोडं पण कामाचं
 •  गेल्या सुमारे पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या ऑफलाइन शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत.
 • पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू (School reopen)करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे.
 • विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत वेगवेगळी मते होती.

Guidlines of School Reopen ।  मुंबई :  गेल्या सुमारे पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या ऑफलाइन प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू (School reopen)करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत वेगवेगळी मते होती. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने पहिली ते बारावीपर्यंत सर्व वर्गांच्या शाळा सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखवलाय. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षक आणि शाळेवर अधिक असणार आहे.

शाळा सुरू करण्यासाठी जारी करण्यात आलेली यापूर्वीची नियमावली

(i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.

(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. 

 1. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात याव्या 
 2. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा 
 3. दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर ठेवण्यात यावे. 
 4. एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी हजर असावे. त्या पेक्षा अधिक विद्यार्थी असू नये
 5. जेवण झाले आणि मधल्या सुट्टीत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे 
 6. तसेच लगेच कोरोना चाचणी करून घेणे. 
 7. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी
 8. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
 9. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
 10. संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी