आठ तास चौकशीनंतर उन्मेष जोशी पुन्हा ईडीच्या कार्यालयात, राजन शिरोडकरही हजर 

मुंबई
Updated Aug 20, 2019 | 13:20 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली. तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी आज पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत. 

Unmesh Joshi
उन्मेष जोशी पुन्हा ईडीच्या कार्यालयात, राजन शिरोडकरही हजर  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली
  •  २२ ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत
  • शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची ईडीच्या कार्यालयात सोमवारी तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली
  • सकाळी ११ वाजता कार्यालयात गेलेले जोशी रात्री सव्वा सातच्या सुमारास तेथून बाहेर पडले.
  • आज पुन्हा उन्मेष जोशी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
  • राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकर ईडीच्या कार्यालयात हजर झालेत.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली.  २२ ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. राज ठाकरे यांच्यासोबतच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची ईडीच्या कार्यालयात सोमवारी तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली.सकाळी ११ वाजता कार्यालयात गेलेले जोशी रात्री सव्वा सातच्या सुमारास तेथून बाहेर पडले. दरम्यान आज पुन्हा उन्मेष जोशी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकर ईडीच्या कार्यालयात हजर झालेत. या दोघांची एकत्र चौकशी केली जात आहे. 

दरम्यान सोमवारी कार्यालयात जाताना त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की, ईडीकडून मला कोणतेही प्रश्न पाठवण्यात आले नाहीत. मी त्यांना पूर्ण सहकार्य करेनं. कदाचित कोहिनूर बिल्डिंगसंबंधी माहिती घेण्यासाठी बोलवण्यात आलं असावं. त्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास जोशी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. आपण ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. मी आणि ईडीचे अधिकारीही समाधानी असून पुन्हा चौकशीसाठी बोलवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

नेमकं असं आहे प्रकरण? 

कोहिनूर मिलच्या जागेचा ४२१ कोटी रुपयांना लिलाव झाला. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. कोहिनूर मिलची जागा विकत घेत असताना उन्मेष यांनी 'ILFS'ला सोबत घेतलं आणि कर्जाची रक्कम उभी केली. ४२१ कोटींपैकी ५० टक्के रक्कम उन्मेष जोशी यांची होती तर उर्वरित रक्कम आयएलएफएसने उपलब्ध करुन दिली. गुंतवणूक २२५ कोटी रुपयांची असतानाही ILFSने आपला हिस्सा उन्मेष यांना अवघ्या ९० कोटी रुपयांना विकला. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस (ILFS) ने उन्मेष जोशी यांच्या कंपनीला ५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं. हे कर्ज न फेडता न आल्याने त्याबदल्यात जागा देण्याचा उन्मेष जोशी यांचा इरादा होता. हा सर्व व्यवहार २०११ रोजी झाला होता. मात्र, नोंदणी २०१७मध्ये करण्यात आली. तर, राज ठाकरे यांनी २००८ साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होते.

राज ठाकरेंच्या सूचनेनंतर बंद मागे 

राज ठाकरे यांनी ईडीनं नोटीस पाठवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये बराच असंतोष निर्माण झाला. यामुळे सरकारविरोधात ठाणे बंदचं आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी बंद मागे घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर तात्काळ कार्यकर्त्यांनी बंद घेतल्याचं घोषित केलं. लोकांना त्रास होईल, असं काही करून नका, अशा सूचना दिल्या. 

मनसे नेत्यांची बैठक पार

ईडीच्या नोटीशीनंतर मनसे नेत्यांची बैठक सोमवारी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बंद मागे घेण्याच्या सूचना केल्या. सामान्य जनतेला त्रास होऊ नये असं म्हणत राज ठाकरेंनी बंद मागे घेण्यास सांगितलं. कारण, बंद दरम्यान, ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास तरी हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...