पूरग्रस्तांसाठी ६,००० कोटींची मदत, निधीसाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई
Updated Aug 13, 2019 | 16:25 IST

अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या पूरग्रस्त भागांसाठी मदत करण्यासाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. तसेच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सहा हजार कोटी रुपयांची मदत निधीची मागणी केली आहे.

Sangli flood file photo
सांगलीत आलेला पूर (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: गेल्या महिन्याभरात राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिक या भागांना मोठा फटका बसला. पूरग्रस्त भागांत राहणाऱ्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी आता राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांच्या मदत निधीची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विविध भागात अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी सहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव हा प्राथमिक माहितीनुसार पाठवला जाणार आहे त्यानंतर पुन्हा पूरस्थिती भागांचे पंचनामे करुन प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.

एकूण ६,८१३ कोटी रुपयांची मदत

सहा हजार कोटी रुपयांपैकी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ४ हजार ७०८ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कोकण, नाशिक आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार १०५ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव आहे. म्हणजेच राज्यभरातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून एकूण ६,८१३ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.

मदतीचं स्वरूप कसं असणार ?

 1. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी ३०० कोटी रुपये 
 2. पूरग्रस्त भागासाठी २५ कोटी रुपये 
 3. पूरग्रस्त भागातील नागरिकांना पूरवण्यात येणारं अन्न, कपडे, औषधे यासाठी २७ कोटी रुपये 
 4. पूरग्रस्त भागात निर्माण झालेल्या परिस्थितीची साफ सफाई करण्यासाठी ६६ ते ७० कोटी रुपये
 5. पूरग्रस्त भागात निर्माण झालेल्या परिस्थितीची साफ सफाई करण्यासाठी ६६ ते ७० कोटी रुपये
 6. शेती, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २०८८ कोटी रुपये
 7. पूरस्थितीत दगावलेल्या जनावरांच्या नुकसानासाठी ३० कोटी रुपये 
 8. मच्छिमारांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपये 
 9. घरांची झालेली पडझड आणि इतर नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी २२२ कोटी रुपये
 10. रस्ते आणि पूल यांच्या दुरुस्तीसाठी ८७६ कोटी रुपये 
 11. जलसंपदा विभाग आणि जलसंसाधरण विभागासाठी १६८ कोटी रुपये 
 12. सार्वजनिक आरोग्यासाठी ७५ कोटी रुपये 
 13. पूरस्थितीत शाळांच्या पडझडीची दुरुस्ती करण्यासाठी तसेच पाणी पुरवठ्यासाठी १२५ कोटी रुपये
 14. छोट्या व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाईसाठी ३०० कोटी रुपये 

राज्यात झालेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम एनडीआरएफ, नौदल, आर्मीच्या पथकांसह करण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात पूरस्थितीत अडकलेल्या ५ लाख ६० हजार ९५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या कार्यात एनडीआरएफचे २२, एसडीआरएफच्या ३, नौदलाच्या १८, तटरक्षकदलाच्या ८ आणि आर्मीच्या १७ पथकांनी महत्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
पूरग्रस्तांसाठी ६,००० कोटींची मदत, निधीसाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी Description: अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या पूरग्रस्त भागांसाठी मदत करण्यासाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. तसेच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सहा हजार कोटी रुपयांची मदत निधीची मागणी केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...