lalbaug cha raja : लालबागच्या राजाला भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, पोलिसांनी केली मध्यस्थी

दोन वर्षानंतर कोरोना संकट आटोक्यात आले आहे आणि मोठ्या उत्साहात राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. लालबागमध्येही लालगाबचा राजा गणपती बसला असून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. या वेळी महिला भाविक आणि महिला सुरक्षा रक्षकात बाचाबाची झाली आहे तसेच दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली आहे. इतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Lalbaugcha raja
लालगाबचा राजा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दोन वर्षानंतर कोरोना संकट आटोक्यात आले आहे आणि मोठ्या उत्साहात राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे.
  • लालबागमध्येही लालगाबचा राजा गणपती बसला असून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
  • या वेळी महिला भाविक आणि महिला सुरक्षा रक्षकात बाचाबाची झाली आहे तसेच दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली आहे.

Lalbaugcha Raja : मुंबई : दोन वर्षानंतर कोरोना संकट आटोक्यात आले आहे आणि मोठ्या उत्साहात राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. लालबागमध्येही लालगाबचा राजा गणपती बसला असून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. या वेळी महिला भाविक आणि महिला सुरक्षा रक्षकात बाचाबाची झाली आहे तसेच दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली आहे. इतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. (lalbaug cha raja devotee and female bodyguard argument while mukhadarshan)

Ganesh Chaturthi 2022:  गणेश चतुर्थीच्या दिवशी जुळन येईल हा शुभ योग, जाणून घ्या गणपतीची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. आता कोरोना संकट आटोक्यात आल्यानंतर सर्व सण आणि उत्सवांवर निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवमध्ये भाविकांमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे. लालबागमध्ये लालबागचा राजा विराजमान झाला असून लोकांनी दोन दिवसांपूर्वीच रांग लावायला सुरूवात केली आहे. मुखदर्शन आणि नवसाच्या अशा दोन रांगा लावल्या जातात. त्यात नवसाच्या रांगेत जवळून दर्शन दिले जाते. तर मुखदर्शनमध्ये दूरून फक्त गणपतीचे मुखदर्शन दिले जाते. आज गणेश चतुर्थीला लालबागच्या राज्याचा दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तेव्हा मुखदर्शनावेळी एका महिलेची आणि महिला सुरक्षेच्या वेळी बाचाबाची झाली इतकेच नाही तर दोघांमध्ये थोडी धक्काबुक्कीही झाली होती. ही महिल्या आपल्या मुलीसोबत लालबागच्या मुखदर्शनासाठी आली होती. मुखदर्शला दर्शन घेतल्यानंतर लगेच तिथून निघायचे असते, परंतु ही महिला थोडा वेळ थांबून प्रार्थना करत होती, तेव्हा महिला सुरक्षा रक्षकाने तिला पुढे जाण्यास सांगितले. त्यावरून महिला भाविक आणि महिला सुरक्षा रक्षकांत बाचाबाची झाली. तेव्हा उपस्थित पोलीस आणि लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षक पोहोचले आणि दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 

Happy Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi : बाप्पा आतुरता तुझ्या आगमनाची Facebook आणि Whatsapp मेसेज


लालबागला वादाची परंपरा

लालबागला वादाची मोठी परंपरा आहे. त्यात भाविकांना धक्काबुक्की करणे, माध्यकर्मीना लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण अशा घटनांचा समावेश आहे. २०१२ साली लालगाचा राजाच्या कार्यकर्त्यांनी महिला पोलीस हिराबाई पवार यांच्या थोबाडीत मारली होती. २०१३ साली कार्यकर्ते महिला आणि लहान मुलाचे डोके गणपतीच्या पायावर आपटतनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इतकेच नाही तर दर्शनावेळी कार्यकर्ते भाविकांना अक्षरशः लोटत होते असाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

Happy Ganesh Chaturthi HD Wishes in marathi : गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून द्या शुभेच्छापत्र

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी