पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाकडून अवघ्या इतक्या लाखांचीच मदत

मुंबई
Updated Aug 14, 2019 | 18:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lalbaugcha Raja: राज्यातील विविध भागांत आलेल्या पूरस्थितीनंतर सर्वच स्तरातून मदत देण्यास सुरूवात झाली आहे. आता या पूरग्रस्तांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागचा राजा धावून आला आहे.

Lalbaugcha Raja
लालबागचा राजा (फोटो सौजन्य: @LalbaugchaRaja)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • पूरग्रस्तांच्या मदतीला लालबागचा राजा
  • लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांना केवळ २५ लाखांची मदत
  • राज्यातील पूरग्रस्तांसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू

मुंबई: गेल्या महिन्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यांत कुठं मुसळधार पाऊस झाला तर कुठं अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कोल्हापूर, सांगली जिल्ह्याल बसला आहे. जवळपास आठवडाभर हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली गेले होते. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेकांचं संसार पूराच्या पाण्यात वाहून गेले. शेती सुद्धा उद्वस्त झाली, जनावरे दगावली, होतं नव्हतं ते सर्वच पूराच्या पाण्यात वाहून गेलं. या पूरस्थितीनंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे. त्यात या पूरग्रस्तांना आधार देतेय ती म्हणजे सर्वच स्तरातून होणाऱ्या मदतीची.

लालबागचा राजाची पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सुद्धा पूढाकार घेतला आहे. मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळातर्फे पूरग्रस्तांना मदत दिली आहे. लालबागचा राजा गणेश मंडळाने पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत दिली आहे. मात्र, कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या गणेशोत्सव मंडळाकडून अवघ्या २५ लाखांचीच मदत का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसं पहायला गेलं तर लालबागचा राजा मंडळात भाविकांकडून कोट्यावधी रुपयांचं सोनं, रोख रक्कम दान केली जाते मात्र, तरिही पूरग्रस्थांसाठी मंडळाने इतकी लहान रक्कम का दिली. राज्यातील विविध स्तरातून पूरग्रस्तांना मदत दिली जात आहे. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार मदत करत आहे आणि त्यात हजार रुपयांपासून कोट्यावधी रुपयांच्या मदतीचा समावेश आहे.

 

 

चिंचपोकळीचा चिंतामणीकडूनही मदत

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबतच इतरही गणेशोत्सव मंडळांकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सुद्धा पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत दिली आहे. या गणेशोत्सव मंडळांकडून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांची नावे आणि मदतनिधी म्हणून देण्यात आलेली रक्कम दिली आहे. या यादीमध्ये अनेकांची नावे आणि त्यांनी दिलेली रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

 

 

पूरग्रस्तांसाठी ६,००० कोटींची मदत

राज्यभरातील विविध भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर पूरग्रस्त भागातील नागरिकांना राज्य सरकारतर्फे ६,००० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. या रकमेपैकी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ४ हजार ७०८ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तर कोकण, नाशिक आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार १०५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे.

रितेश-जेनेलियाची पूरग्रस्तांना मदत

बॉलिवूडचं क्यूट कपलं अशी ओळख असलेल्या अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांनी सुद्धा पूरग्रस्तांना मदत केली आहे. रितेश-जेनेलिया यांनी पूरग्रस्तांसाठी २५ लाख रुपयांची मदत दिली आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २५ लाख रुपयांचा चेक दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...