Lalbaugcha Raja Live : लालबागचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Sep 09, 2022 | 14:10 IST

Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022 Live : TimeNowMarathi वर लालबागचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक Live बघता येईल....

Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022 Live
लालबागचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लालबागचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक
  • बघा Live 
  • परंपरेनुसार लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाने मुंबईतील गणेशोत्सवाची सांगता होईल

Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022 Live : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गणपती विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरू आहेत. लाखो भाविकांचे आकर्षण असलेल्या लालबागचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. ही मिरवणूक उद्या सकाळी गिरगाव चौपाटी येथे पोहोचेल. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर मिरवणुकीचा समारोप होईल. परंपरेनुसार लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाने मुंबईतील गणेशोत्सवाची सांगता होईल.

सेलिब्रेटींची उपस्थिती, नवसाला पावणारा अशी ख्याती झाल्यामुळे कायम चर्चेत असलेल्या लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. अगदी विसर्जनाच्या वेळीही राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर अलोट गर्दी होते. यंदाही हीच परिस्थिती आहे. दोन वर्ष कोरोना संकटामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते. या निर्बंधांतून मुक्त झाल्यानंतर मुंबईकर पुन्हा एकदा उत्साहाने लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर दाटीवाटीने उभे आहेत. रस्त्यालगतच्या इमारतींमधून खिडक्या, बाल्कनी, गच्ची येथे गर्दी करून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे....एवढी गर्दी करूनही अनेकदा लालबागच्या राजाचे मनासारखे दर्शन घेता येत नाही. भाविकांचे समाधान होत नाही. पण आता असे होणार नाही. TimeNowMarathi वर लालबागचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक Live बघता येईल.....

विसर्जनासाठी विशेष तयारी

विसर्जनासाठी गिरगाव, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा, मार्वे खाडी येथे तयारी करण्यात आली आहे. तसेच इतर ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि १७३ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. पालिकेनं फिरत्या कृत्रिम तलावांचीही व्यवस्था केली आहे. सर्वच विसर्जन स्थळी भाविकांसाठी नागरी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. 

मुंबईत मोठा फौजफाटा

विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलस दलातील ३ हजार २०० अधिकारी, १५ हजार ५००  कर्मचारी आणि जवानांच्या दिमतीला केंद्रीय आणि राज्य राखीव बलाच्या आठ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, शिघ्रकृती दल, एक फोर्सवन, ७५० होमगार्ड, २५० प्रशिक्षणार्थी  आणि सिव्हील डिफेन्स तैनात करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 

चित्रविचित्र पुतळे

मुंबईसह ६ शहरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजा आणि शुभ मुहूर्त 

  1. अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ - ८ सप्टेंबर २०२२, रात्री ९ वाजून ०२ मिनिटांपासून
  2. अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती - ९ सप्टेंबर २०२२, सायंकाळी ६ वाजून ०७ मिनिटांपर्यंत

पूजा मुहूर्त 

  1. सकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ते सायंकाळी ६ वाजून ०७ मिनिटांपर्यंत (९ सप्टेंबर २०२२) 
  2. पूजेचा कालावधी - ११ तास ५८ मिनिटे

भरती आणि ओहोटीच्या वेळा

  1. पूर्ण भरती: सकाळी ११.१६ पाण्याची उंची ४.५२ मीटर, रात्री ११.२७ पाण्याची उंची ४.२५ मीटर
  2. पूर्ण ओहोटी: पहाटे ४.३६ पाण्याची उंची ०.५३ मीटर, सायं. ५.२२ पाण्याची उंची १.११ मीटर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी