Last Date For Vjnt And Obc And Sbc Students Applying For Govt Scholarship To Study Abroad Is Extended Till 20th July : महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विजाभन विभागाकडून दिनांक २३ मे २०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक २३ जून २०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. मागास बहुजन कल्याण विभागाने मुदतवाढीची माहिती पत्रकाद्वारे दिली.
शासनाच्या अटींनुसार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. उमेदवार किंवा उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक, तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यावत सन ०२२ मधील द टाइम्स हायर एज्युकेशन किंवा QS Qualcquarelli Symonds रँकिंग २००च्या आत असणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराच्या पालकांचे किंवा कटुंबाचे आणि उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील वर्षातील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखांहून जास्त नसावे. दिनांक १ जुलै रोजी उमेदवाराचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या अटी आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार, या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्यु्त्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अशी या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. त्याच प्रमाणे पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.