लतादीदींची प्रकृती स्थिर पण अद्याप ICU मध्येच!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 27, 2022 | 16:34 IST

Lata didi continues to be in the ICU at Breach Candy Hospital Mumbai : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (९२) यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लतादीदी हॉस्पिटलच्या आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात (Intensive Care Unit - ICU) ९ जानेवारी २०२२ पासून उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे पण वयाचा विचार करुन त्यांना आयसीयूमध्येच उपचार देण्यात येत आहेत. 

Lata didi continues to be in the ICU at Breach Candy Hospital Mumbai
लतादीदींची प्रकृती स्थिर पण अद्याप ICU मध्येच! 
थोडं पण कामाचं
  • लतादीदींची प्रकृती स्थिर पण अद्याप ICU मध्येच!
  • प्रकृती स्थिर आहे पण वयाचा विचार करुन आयसीयूमध्येच उपचार
  • डॉ प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांच्या नेतृत्वात एक वैद्यकीय पथक लतादीदींच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे

Lata didi continues to be in the ICU at Breach Candy Hospital Mumbai : मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (९२) यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लतादीदी हॉस्पिटलच्या आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात (Intensive Care Unit - ICU) ९ जानेवारी २०२२ पासून उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे पण वयाचा विचार करुन त्यांना आयसीयूमध्येच उपचार देण्यात येत आहेत. 

आज सकाळी लतादीदींची एक्सट्यूबेशनची चाचणी झाली. लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. पण डॉ प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांच्या नेतृत्वात एक वैद्यकीय पथक लतादीदींच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांचे उपचार करत आहे. लतादीदींविषयी कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये आणि चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; असे आवाहन अधिकृत प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर (Anusha Srinivasan Iyer) यांनी केले. 

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची माहिती अनुषा यांच्यामार्फत माध्यमांनी दिली जात आहे. पण काही माध्यमांनी लतादीदी अनेक दिवसांपासून आयसीयूमध्ये असल्याचा मुद्दा पुढे करून अपुऱ्या माहितीआधारे वृत्त दिले आहे. यामुळे अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. पण या अफवांवर विश्वास ठेवू नका. लतादीदींचे उपचार सुरू आहेत. त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी देवाकडे प्रार्थना करायला हरकत नाही पण अफवा पसरवू नका; असे अधिकृत प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर म्हणाल्या.

अधिकृत प्रसिद्धीपत्रक...

Statement from Mangeshkar family

Lata didi continues to be in the ICU at Breach Candy Hospital, Mumbai under treatment. 
She has been given a TRIAL of extubation ( off the invasive Ventilator ) this morning. 

Presently, she is showing signs of improvement but will remain under observation of the team of doctors headed by Dr Pratit Samdani.

We thank each one of for your prayers and good wishes.

Anusha Srinivasan Iyer

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी