लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 24, 2022 | 22:15 IST

Lata Mangeshkar brother Hridaynath Mangeshkar Hospitalized : दिवंगत लता मंगेशकर यांचे बंधू संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयनाथ यांचे पुत्र गायक आदिनाथ मंगेशकर यांनी ही माहिती दिली. 

Lata Mangeshkar brother Hridaynath Mangeshkar Hospitalized
लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये
  • हृदयनाथ यांचे पुत्र गायक आदिनाथ मंगेशकर यांनी ही माहिती दिली
  • हृदयनाथ यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली तर दोन आठवड्यांच्या आत त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल

Lata Mangeshkar brother Hridaynath Mangeshkar Hospitalized : मुंबई : दिवंगत लता मंगेशकर यांचे बंधू संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयनाथ यांचे पुत्र गायक आदिनाथ मंगेशकर यांनी ही माहिती दिली. 

हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहेत. यामुळेच पंतप्रधान मोदींना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते सोहळ्याला उपस्थित नव्हते. डॉक्टरांच्या देखरेखीत हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदयनाथ यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली तर दोन आठवड्यांच्या आत त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल; अशी माहिती आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

दरवेळी मंगेशकर कुटुंबाने आयोजिलेल्या सोहळ्यात मान्यवरांचे स्वागत हृदयनाथ मंगेशकर करतात. यानंतर मंगेशकर कुटुंबाच्या ट्रस्टची माहिती देणे आणि कार्यक्रमाची रुपरेखा थोडक्यात सांगणे हे काम हृदयनाथ मंगेशकर करतात. पण यावेळी ही जबाबदारी मी पार पाडत आहे असे सांगत आदिनाथ मंगेशकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वागतपर भाषणाच्या सुरुवातीलाच आदिनाथ मंगेशकर यांनी वडिलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिली. तसेच वडील लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाला अनेक दिग्गज उपस्थित होते. दिग्गजांच्या उपस्थितीत पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. हा पुरस्कार देशाला समर्पित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी हृदयनाथ मंगेशकर लवकर बरे होऊन घरी परतावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. 

मंगेशकर कुटुंबात हृदयनाथ मंगेशकर हे बाळासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ते मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे सर्वात लहान पुत्र. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडिकर यांचे धाकटे बंधू. हृदयनाथ मंगेशकर यांनी हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीसाठी अनेक गाण्यांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेली अनेक गाणी आजही गुणगुणली जातात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी