Lata Mangeshkar Still In ICU At Breach Candy Hospital Mumbai : मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (९२) यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लतादीदी हॉस्पिटलच्या आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात (Intensive Care Unit - ICU) ९ जानेवारी २०२२ पासून उपचार घेत आहेत. वयाचा विचार करता लतादीदींना उपचारांसाठी किमान दहा ते बारा दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागेल; असे डॉ प्रतीत समधानी यांनी आधीच सांगितले आहे. यामुळे लतादीदींविषयी कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये आणि चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; असे आवाहन अधिकृत प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी केले. लतादीदींवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे; असेही अनुषा यांनी सांगितले.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची माहिती अनुषा यांच्यामार्फत माध्यमांनी दिली जात आहे. पण काही माध्यमांनी लतादीदी अनेक दिवसांपासून आयसीयूमध्ये असल्याचा मुद्दा पुढे करून अपुऱ्या माहितीआधारे वृत्त दिले आहे. यामुळे अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. पण या अफवांवर विश्वास ठेवू नका. लतादीदींचे उपचार सुरू आहेत. त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी देवाकडे प्रार्थना करायला हरकत नाही पण अफवा पसरवू नका; असे अधिकृत प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर म्हणाल्या.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.