मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) यापैकी नेमका कोणाचा उमेदवार विजयी होणार याचा निर्णय केवळ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या हातात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी टॉप टू बॉटमचे नेते कामाला लागले आहेत. शिवाय स्वतः उमेदावर देखील राज्यभरातील आमदारांच्या भेटीसाठी दौऱ्यावर आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे उमेदवार व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपचे संकटमोचन ओळखले जाणारे गिरीश महाजन आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, विधानपरिषदेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. (Legislative Council Election : Pravin Darekar and Girish Mahajan to meet MLA Hitendra Thakur)
अधिक वाचा :
मान्सूनचा जोर वाढला, येत्या २४ तासात विजांच्या राज्यात कडकडाटासह पावसाची शक्यता
विधानपरिषदेसाठी एक-एक मतासाठी रस्सीखेच सुरु असल्यामुळे सध्या ३ मते असलेल्या बहुजन विकास आघाडीला चांगले दिवस आले आहेत. या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची नेते मंडळी त्यांच्या घरी चक्करा घालत आहेत. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काल ठाकुर यांची भेट घेतल्यानंतर लगेचच भाजपचे संकट मोचन ओळखले जाणारे आमदार गिरीश महाराज आणि प्रवीण दरेकर यांनी चर्चगेटहून विरारला लोकलनं प्रवास करत ठाकूरांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार मंगेश चव्हाण सुद्धा होते..
अधिक वाचा :
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी गिरीश महाजन यांनी भेटी घेतली होती. यावेळी तब्बल दोन तासांच्या भेटीत महाजन यांनी ठाकूर यांच्याकडून पाठिंब्यासाठीचा शब्द घेवूनच बाहेर पडले होते. पण ठाकूर कोणाला पाठिंबा दिला हे जाहीर केले नव्हते. यावेळी ते कोणाला पाठिंबा देतात, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.