राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकीचे पत्र

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 11, 2022 | 15:24 IST

Letter of threat to Raj Thackeray and Bala Nandgaonkar : मशिदींवरच्या भोंग्यांना विरोध म्हणून हनुमान चालीसा आंदोलनाची घोषणा करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर या दोघांना धमकीचे पत्र आले आहे.

Letter of threat to Raj Thackeray and Bala Nandgaonkar
राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकीचे पत्र  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकीचे पत्र
  • राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटले बाळा नांदगावकर
  • धमकीची दिली माहिती

Letter of threat to Raj Thackeray and Bala Nandgaonkar : मुंबई : मशिदींवरच्या भोंग्यांना विरोध म्हणून हनुमान चालीसा आंदोलनाची घोषणा करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर या दोघांना धमकीचे पत्र आले आहे. तसेच दोन्ही नेत्यांनी धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणी बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीदरम्यान बाळा नांदगावकर यांनी धमक्यांविषयीची माहिती गृहमंत्र्यांना दिली. हीच माहिती नांदगावकर यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनाही दिली आहे.

राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना पाठविण्यात आलेल्या धमकीच्या पत्रांमध्ये हिंदी आणि उर्दू भाषेतील शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या धमक्यांची माहिती बाळा नांदगावकर यांनी मीडिया प्रतिनिधींना दिली. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल असा इशारा बाळा नांदगावकर यांनी मीडिया प्रतिनिधींशी बोलताना दिला.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी